esakal | 70 फुट खोल विहिरीत तरंगत होता मृतदेह, रात्री दोन वाजता सुरू झाले सर्च ऑपरेशन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Crime News Sant Gadge Baba Emergency Search and Rescue Squad removes body from well

24 फेब्रुवारी रोजी दुपारी  12:00 वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे आपल्या बोरगाव ते कोळंबी रोडला लागुन असलेल्या शेतात गेलेल्या अंदाजे ७० वर्षे वय असलेल्या बोरगाव खु. येथील गोदावरी बळीरामसा दत्तगाडे  रा.बोरगाव  रात्री बराच वेळ होऊनही घरी परतल्या नाहीत.

70 फुट खोल विहिरीत तरंगत होता मृतदेह, रात्री दोन वाजता सुरू झाले सर्च ऑपरेशन

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला: -24 फेब्रुवारी रोजी दुपारी  12:00 वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे आपल्या बोरगाव ते कोळंबी रोडला लागुन असलेल्या शेतात गेलेल्या अंदाजे ७० वर्षे वय असलेल्या बोरगाव खु. येथील गोदावरी बळीरामसा दत्तगाडे  रा.बोरगाव  रात्री बराच वेळ होऊनही घरी परतल्या नाहीत.

गोदावरी दत्तगाडे यांच्या शेताला लागुन असलेले शेतकरी डिगांबर लोडम हे रात्री आपल्या शेतात 8:00 वाजताच्या सुमारास कढाऊ पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता तेव्हा लोडम यांच्या विहीरीत एका महीलेचा मृतदेह तरंगताना दीसल्याने लोडम यांनी लगेच गावात पोलिस पाटलांशी  संपर्क करुन माहिती दिली.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

यावेळी पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पडघान यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले.

जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी कुलदीप जयस्वाल,ऋतीक सदाफळे, निखील ठाकरे हे शोध व बचाव साहित्य आणी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले.

हेही वाचा - कोरोनाचा विस्फोट; एकाच रात्रीत अवघे गाव झाले हॉटस्पॉट

विहीर ही 70 फुट खोल आणी अर्ध्यातुन कच्ची व अंधार असल्याने सर्च ऑपरेशनला अडथळे निर्माण होत होते. शेवटी चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर गोदावरी दत्तगाडे यांचा मृतदेह रात्री 1:00 वाजता शोधुन बाहेर काढ्यात त्यांना यश आलं.

हेही वाचा - महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण

 यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार  एपीआय पडघान, बी.ज.सोळंके, तसेच पोलिस कर्मचारी व बोरगाव खु.येथील पोलिस पाटील.चोपडे यांच्यासह नातेवाईक तथा गावकरी हजर होते.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

वाचा -

कोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन!

वाचा -

70 फुट खोल विहिरीत तरंगत होता मृतदेह, रात्री दोन वाजता सुरू झाले सर्च ऑपरेशन

वाचा -

Video: अपघातात आले अपंगत्व, उपचारालाही पैसे नाहीत, अठराविश्व दारीद्र्याचा अनुसुया ओढते गाढा

वाचा -

पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत

वाचा -

चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !

वाचा -

धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण

loading image