esakal | कोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona News Order not to survey the remaining drones due to covid19

 राज्य शासनाने राज्यातील नगर भूमापन मोजणी न झालेल्या ४० हजार गावांच्या गावठाणाची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

कोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन!

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला :  राज्य शासनाने राज्यातील नगर भूमापन मोजणी न झालेल्या ४० हजार गावांच्या गावठाणाची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ८६७ गावांचे गावठाणाचे ड्रोन सर्व्हेक्षणाचे नियोजन केले असून गत १२ जानेवारीला मूर्तिजापूरातील खापरखेडा येथून ड्रोन सर्व्हेक्षणाला याची सुरुवातही झाली मात्र आता वाढत्या कोवीडच्या प्रसारामुळे सर्व्हेक्षण बंद करण्याचे आदेश भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झाले आहे.

केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेतंर्गत गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ड्रोन मोजणीप्रकल्पाद्वारे सर्व्हेक्षण होवून गावठाणातील प्रत्येक मालमत्तेचा नकाशा या सर्व्हेक्षणाद्वारे तयार होणार आहे.सर्वसाधारणपणे पद्धतीने गावठाण मोजणीसाठी १५ ते ३० दिवस लागतात मात्र ड्रोनच्या साह्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

गावठाणातील आणि गावठाणाबाहेरील भागांचे सर्वेक्षण पूर्ण करून मालमत्तेचे पत्रक अचूक तयार करणे यामुळे शक्य होणार आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतले आहे.त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोनाचा विस्फोट; एकाच रात्रीत अवघे गाव झाले हॉटस्पॉट

जिल्ह्यात १२ जानेवारी २०२० पासून मूर्तिजापूर तालुक्यातून सर्व्हेक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभ केला.आतापर्यंत २७१ गावांचे ड्रोन सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे.शिवाय तेल्हारा तालुक्यातील गावठाणाचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे.सर्वसाधारणपणे पद्धतीने गावठाण मोजणीसाठी १५ ते ३० दिवस लागतात मात्र ड्रोनच्या साह्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.गावठाणातील आणि गावठाणाबाहेरील भागांचे सर्वेक्षण पूर्ण करून मालमत्तेचे पत्रक अचूक तयार करणे यामुळे शक्य होणार आहे.मात्र कोरोना संकटामुळे पुन्हा या प्रक्रियेला ग्रहण लागले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण
---------------


जिल्ह्यात गावठाणांचे ड्रोन सर्व्हेक्षणाला मूर्तिजापूर तालुक्यातून १२ जानेवारी पासून सुरुवात झाली.१५ एप्रिल २०२० पर्यंत सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे नियोजन होते.मात्र जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे शासनाने पुढील आदेशापर्यंत सर्व्हेक्षण न करण्याचे आदेश दिले आहेत.
- विलास शिरोळकर, अधीक्षक,भूमी अभिलेख कार्यालय अकोला

---------------------
२७१ गावातील गावठाणांचे सर्व्हेक्षण पूर्ण!
जिल्ह्यातील ८६७ गावातील गावठाणांचे ड्रोन द्वारे सर्व्हेक्षण करण्याचा कार्यक्रम १५० कर्मचाऱ्यांमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. यातील २७१ गावातील गावठाणांचे सर्व्हेक्षण आटोपले आहे.तर उर्वरित गावातील सर्व्हेक्षण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आले आहे.आधी पाऊस आता कोरोना यामुळे वर्षांपासून सर्व्हेक्षण लांबले आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

वाचा -

कोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन!

वाचा -

70 फुट खोल विहिरीत तरंगत होता मृतदेह, रात्री दोन वाजता सुरू झाले सर्च ऑपरेशन

वाचा -

Video: अपघातात आले अपंगत्व, उपचारालाही पैसे नाहीत, अठराविश्व दारीद्र्याचा अनुसुया ओढते गाढा

वाचा -

पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत

वाचा -

चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !

वाचा -

धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण

loading image