esakal | बुलडाणा जिल्ह्यातून धावणारा हायस्पीड बुलेट ट्रेन; डीपीआरच्या कामाला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

बुलडाणा जिल्ह्यातून धावणारा हायस्पीड बुलेट ट्रेन

बुलडाणा जिल्ह्यातून धावणारा हायस्पीड बुलेट ट्रेन

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

बुलडाणा : जिल्ह्यातील मेहकर, देऊळगावराजा आणि सिंदखेडराजा तालुक्यातून नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग जात असून, महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सदर काम अंतिम टप्प्यात असतानाच शासनाने या महामार्गालगत मुंबई ते नागपूर अतिवेगवान रेल्वे (हायस्पीड ट्रेन) प्रकल्प हाती घेतला आहे. याबाबत तसेच डीपीआर तयार करण्यासोबतच संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीविषयी अडचणी जाणून घेणे आणि हायस्पीड ट्रेनचे आज (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रेझेंटेशन देण्यात आले. यावेळी प्रशासन व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Bullet-train-Buldhana-District-Commencement-of-DPR-work-Travel-from-Mumbai-to-Nagpur-nad86)

मुंबई ते नागपूर असे रस्त्याचे १५ ते २० तासांचे अंतर समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शासनाने अवघ्या ८ तासांवर आणले आहे. आता त्याहूनही दळणवळणाला गती देत हायस्पीड ट्रेनच्या माध्यमातून रेल्वे अंतरातील 738.3 किमीचे अंतर अवघ्या ३.३० तासात कापणे शक्य होणार आहे. आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या मते बुलेट ट्रेन म्हटले की फक्त मुंबई ते अहमदाबाद या ट्रेन विषयीच मनात आहे. आता रेल्वेने महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा सुखद धक्का दिला आहे.

हेही वाचा: थक्क करणारा प्रवास! ८० रुपये ते दोन कोटींचा मालक व चार उद्योग

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या बाजूने आता महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातून हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार असून आज राज्यातील पहिली बैठक बुलडाणा येथे पार पडली. या हायस्पीड ट्रेनच रेल्वेचे समाज विकास अधिकारी श्याम चौगुले यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसमोर प्रेझेंटेशन दिले. या हायस्पीड ट्रेनचा डीपीआर बनविण्याचे काम देखील सुरू झाले आहे. दहा जिल्ह्यांत स्थानिक प्रशासन व रेल्वे कमिटी याबद्दल काम सुरू करणार आहे. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी दिनेश गीते आदी उपस्थित होते. 

असे असणार वैशिष्ट्ये 

 • दहा जिल्ह्यांतून रेल्वे मार्ग जाणार

 • नागपूर ते मुंबई केवळ ३.३० तासात होणार प्रवास

 • जास्तीत जास्त ३५० किमी प्रती तास वेग

 • एकावेळी जास्तीत जास्त ७५० जण प्रवास करू शकतील

 • बुलडाणा जिल्ह्यातील १,२४५ हेक्टर जमीन मार्गासाठी लागणार

 • बुलडाणा जिल्ह्यात मेहकर रेल्वे स्टेशन, जंगल परिसरात बोगदे करण्यात येणार

 • नागपूर ते ठाणे ३७० गावे होणार प्रभावित

 • बुलडाणा जिल्ह्यातील ४७ गावे येणार मार्गात

 • जिल्ह्यातून ८७ किमी रेल्वे मार्ग

 • ट्रेन मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यातून जाणार

 • जमिनीची थेट खरेदी पद्धत

 • शहरात अडीच टक्के तर ग्रामीण भागातील जमिनीची रक्कम पाचपट

हेही वाचा: ‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

जागतिक बँकेकडे प्रस्ताव

बुलडाणा जिल्ह्यातून हायस्पीड लोहमार्ग प्रकल्पाचे सादरीकरण झाले आहे. लवकरच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. हा अहवाल तयार झाल्यावर तो जागतिक बँकेकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जागतिक बँकेने मंजूर केल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.

हायस्पीड बुलेट ट्रेनच्या पहिल्या प्रकल्प सादरीकरणासह शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पहिली बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांनी बैठकीत येणाऱ्या अडचणी आणि उत्तम प्रतिसाद दिला आहे. डीपीआरचे काम असून, त्यामध्ये सदर बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.
- विजय पाटील, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, बुलडाणा

(Bullet-train-Buldhana-District-Commencement-of-DPR-work-Travel-from-Mumbai-to-Nagpur-nad86)

loading image