esakal | ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद; अत्यावश्यक सेवेसाठीच बस सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीचा गाडा पुन्हा रुतला

एसटीचा गाडा पुन्हा रुतला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना संकटामुळे वर्षभरानंतर पुन्हा एकदा एसटीचा गाडा रुतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संचारबंदी असल्याने एसटी बससेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहे. प्रवाशी संख्या कमी असल्याने महामंडळाने ग्रामीण भागातील बसफेऱ्या कमी केल्या आहेत. जिल्ह्यातील दोन-तीन तालुक्यात बस सोडल्या जात आहेत. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

मार्च २०२१ मध्ये पहिला लॉकडाउन लागला. त्यानंतर तब्बल सहा महिने बस सेवा बंद होती. मजुरांकरिता काही बस चालविण्यात आल्या होत्या. त्यानंतर दिवाळीपासून एसटीची चाके पुन्हा नियमितपणे धावू लागली होती. काही मार्गावरील विशेषतः ग्रामीण भागातील बस सेवा हळूळहू सुरू होत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. अल्पावधीतच संपूर्ण राज्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. संचाबंदी लागू करण्यात आली. आंतरजिल्हा प्रवाशी वाहतूक बंद केली. अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवासाला परवानगी मिळत आहे. परिणामी एसटीचे चाके पुन्हा थांबले. दररोज लाखो रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला.

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची मागणी

एसटी महामंडळाचे कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करीत आहे. अत्यावश्यक सेवेसाठी जीव धोक्यात टाकून प्रवाशांना पोहोचवून देतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना लस देण्याची मागणी होत आहे. मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात चालक-वाहक कोरोनाग्रस्त आढळले आहे.

संपादन - विवेक मेतकर

loading image