esakal | केंद्र,राज्य शासनाकडे धोरणांचा अभाव!

बोलून बातमी शोधा

केंद्र,राज्य शासनाकडे धोरणांचा अभाव!
केंद्र,राज्य शासनाकडे धोरणांचा अभाव!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शासनाकडे उपाययोजनात्मक धोरणांचा अभाव!
-

अकोला : संपूर्ण देशात थैमान घालणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडे ‘एसओपी’चा अभाव आहे. केंद्र व राज्य शासन लॉकडाउनचा उपयोग एसओपी म्हणून करत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे व संपूर्ण यंत्रणा त्यासाठी तोकडी पडत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (ता. २०) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी शासनाला काही उपाययोजना सुद्धा सुचविल्या.

देशात, राज्यात व जिल्ह्यात झपाट्‍याने वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे सर्वत्र पुन्हा लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउनलाच शासनाने स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजन (एसओपी) बनवले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात येण्यास अडचणी येत असून सर्वसामान्यांना वेढीस धरण्यात येत आहे. परिणामी शासनाने उपाययोजनात्मक धोरण म्हणजेच प्रिव्हेंटिव केअर एसओपी तयार करावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या शासकीय निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा: 'नितेश राणे हे बेडकांचे पिल्लू आहे', आमदार पुन्हा बरसले

------------
या सुचविल्या उपाययोजना
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काही उपाययोजना सुद्धा सुचविल्या. त्यात खालील बाबींचा समावेश आहे.
- फक्त आरटीपीसीआर चाचणीमध्येच रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याला कोरोना पॉझिटिव्ह समजावे.
- कोरोना रुग्णावर उपचाराची समान उपचार पद्धती तयार करावी, अर्थात काही कॉम्पीकेशन असल्यास संबंधित डॉक्टर योग्य निर्णय घेवू शकतील. यामध्ये काही रूग्णांवर रेमडेसिव्हिरच्या मर्यादीत वापरावर भर द्यावा.
- प्रत्येक खासगी रुग्णालयात शासनाने एक नोडल ऑफिसर नेमावा. रुग्णाने बिल भरण्यापूर्वी सदर बिल या अधिकाऱ्याने पास करावे, त्यानंतरच रुग्णाने बिल भरावे. असे केल्यास रुग्णांची लूट थांबेल.

हेही वाचा: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण

रुग्णालयांवर कारवाई थांबवावी
कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसल्याने प्रशासन काही रुग्णालयांवर कारवाईचा बडगा चालवत आहे. सदर रुग्णालय कोरोना बाधितांवर उपचार करुन प्रशासनाला सहकार्यच करत आहेत. त्यामुळे रुग्णालयांवर कठोर कारवाई न करता त्यांना त्यातून सुट द्यावी, असे सुद्धा ॲड. आंबेडकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा: तालुकास्तरावर होणार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट


कोविड केअर सेंटरसाठी जागा देवू
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनात ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला जिल्हा परिषद सहकार्य करेल. दानशूर व्यक्तींनी सुद्धा त्यासाठी मदद करावी, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.

संपादन - विवेक मेतकर