अनलॉक होताच बाजारपेठेत गर्दीचा उच्चांक! मलकापूरात नियमांना हरताळ

अनलॉक होताच बाजारपेठेत गर्दीचा उच्चांक! मलकापूरात नियमांना हरताळ
esakal
Summary

राज्य शासनाने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार ५ गटांत वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे निर्बंध हटवण्यात येत आहेत.

मलकापूर (बुलढाणा) : जिल्ह्यात कोरोनाच्या (Corona) संसर्गाचे प्रमाण 'डाऊन' झाल्यानंतर सोमवारी (ता.७) बाजारपेठेचे 'लॉक' उघडले. अनलॉक (Unlock) होताच बाजारपेठेत नागरिकांची तोबा गर्दी उसळत आहे. उसळणाऱ्या गर्दीमुळे अनेक भागांत वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होत आहे. (citizens are flocking to the market as soon as it is unlocked in buldhana district)

अनलॉक होताच बाजारपेठेत गर्दीचा उच्चांक! मलकापूरात नियमांना हरताळ
कऱ्हाडसह मलकापूर पालिकेचाही डंका; नगरपंचायत गटात राज्यात तृतीय

गर्दीमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिले जात असल्‍याचे चित्र बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. त्‍यामुळे यापुढे जबाबदारीने वागून कोरोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घेतली तरच कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यश मिळू शकेल.

अनलॉक होताच बाजारपेठेत गर्दीचा उच्चांक! मलकापूरात नियमांना हरताळ
अकोला: मोठी उमरी, कौलखेड, गौरक्षण रोड, खडकी, मलकापूर प्रतिबंधित क्षेत्र

राज्य शासनाने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार ५ गटांत वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे निर्बंध हटवण्यात येत आहेत. बुलडाणा जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे. या ठिकाणी अत्यावश्यक आणि इतर सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली गेली असली तरी वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यवसायासह इतर सर्व व्यवसाय सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू असणार आहेत. नागरिक दररोज मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याने रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे पोलिसांवर देखील याचा ताण निश्चितच वाढला आहे.

अनलॉक होताच बाजारपेठेत गर्दीचा उच्चांक! मलकापूरात नियमांना हरताळ
पुणे-बंगळूर महामार्गावर मलकापूर हद्दीत अपघात; कालेटेकची महिला जागीच ठार

पेरणीचे दिवस सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही तालुक्यांच्या ठिकाणी शहरात कृषी दुकानांवर बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे कोरोना निर्बंधात अडकलेल्या नागरिकांची सुटका झाली. मात्र, आता घराबाहेर पडताना कोरोनाचा कहर संपलेला नसल्‍याची बाब लक्षात ठेवत जास्त जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. कोरोना महामारीने आतापर्यंत ८५ हजारांवर लोकांना बाधित केले आहे, तर जिल्ह्यातील ६४० जणांचे प्राण घेतलेले आहेत. नोंद न झालेला आकडा यापेक्षा नक्कीच अधिक आहे. तेव्हा आताच सावध राहून तिसऱ्या लाटेपासून स्वत:ला व इतरांनाही सुरक्षित ठेवणे तेवढेच गरजेचे आहे.

अनलॉक होताच बाजारपेठेत गर्दीचा उच्चांक! मलकापूरात नियमांना हरताळ
मलकापूर पालिका पथविक्रेता लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधी देणार

अनेकांना मास्‍कचा विसर

अनलॉक प्रक्रियेंतर्गत सर्वच दुकाने सुरु झाल्‍याने बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी दिसून येत आहे. तर यादरम्‍यान फिजिकल डिस्‍टन्‍सिंगचा फज्‍जा उडत असून अनेक जण विना मास्‍क फिरत असल्‍याचे चित्र आहे. त्‍यामुळे नागरिक आपल्‍या आरोग्‍याच्‍या काळजीपोटी नव्‍हे तर केवळ पोलिसांच्‍या धाकापोटीच मास्‍कचा वापर करतात की काय ? असा प्रश्न उपस्‍थित होत आहे. (citizens are flocking to the market as soon as it is unlocked in buldhana district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com