कोरोनामुळे आणखी तीन रुग्‍णांचा मृत्यू, १९२ नवे रुग्ण आढळले

कोरोनामुळे आणखी तीन रुग्‍णांचा मृत्यू, १९२ नवे रुग्ण आढळले

अकोला ः कोरोना ससंर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त आणखी तीन रुग्णांचा मंगळवारी (ता. १) मृत्यू झाला. त्यासोबतच १९२ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ४१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्या जिल्ह्यात ४ हजार १२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Corona killed three more patients, 192 new patients were found)

कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १) १ हजार ९०७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ७७४ अहवाल निगेटिव्ह तर १३३ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत ५९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने १९२ नव्या रुग्णांची भर पडली.

कोरोनामुळे आणखी तीन रुग्‍णांचा मृत्यू, १९२ नवे रुग्ण आढळले
संतापजनक; शाळकरी विद्यार्थ्याकडून कोविड सेंटरच्या टॉयलेटची सफाई

आरटीपीसीआरच्या चाचणीत १३३ अहवाल पॉझिटिव्ह आढळले त्यात ६१ महिला व ७२ पुरुषांचा समावेश आहे. संबंधित रुग्ण मूर्तिजापूर तालुक्यात १६, अकोट-१३, बाळापूर-१६, बार्शीटाकळी-२, पातूर-१२, तेल्हारा-२, अकोला ग्रामीणमध्ये १६ तर मनपा क्षेत्रात ५६ आहेत.

कोरोनामुळे आणखी तीन रुग्‍णांचा मृत्यू, १९२ नवे रुग्ण आढळले
सर्वच याचिका फेटाळल्या; आता मिनीमंत्रालयाच्या रणधुमाळीची प्रतिक्षा

असे आहेत मृतक
काळेगाव ता. तेल्हारा येथील ५० वर्षीय पुरुष, पिंपरी ता. अकोट येथील ८२ वर्षीय पुरुष, हिवखेड ता. तेल्हारा येथील ५८ वर्षीय पुरुष.

कोरोनामुळे आणखी तीन रुग्‍णांचा मृत्यू, १९२ नवे रुग्ण आढळले
प्रेरणादायी विवाह; ठाणेदार झाले वधू पिता, विस्तार अधिकारी मामा

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५५८६९
- मयत - १०७२
- डिस्चार्ज - ५०६७६
- ॲक्टिव्ह रुग्ण - ४१२१

संपादन - विवेक मेतकर
Corona killed three more patients, 192 new patients were found

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com