सोनीया गांधींना काय पत्र लिहिता, एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मदत मागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनीया गांधींना काय पत्र लिहिता, एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मदत मागा

सोनीया गांधींना काय पत्र लिहिता, एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मदत मागा

अकोला ः काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांना काय पत्र लिहिता, एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनाही पत्र पाठवून महाराष्ट्रासाठी मदत मांगा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांना केलेल्या आवाहनाला फडणवीस यांनी अकोला (Akola) दौऱ्यावर असताना दिलेल्या प्रत्युत्तरात काँग्रेस नेते कांगावेखोर असल्याचा आरोप केला. मी पंतप्रधानांना नेहमीच पत्र पाठवून महाराष्ट्रासाठी मागणी केली व तेसुद्धा मागणी पूर्ण करतात. महाराष्ट्राला आतापर्यंत केंद्राने भरपूर मदत दिली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. Devendra Fadwanis criticizes Congress state president Nana Patole in Akola

देवेंद्र फडणवीस रविवारी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महािवद्यालय (Government Medical College) तथा सर्वोपचार रुग्णालयात कोविडच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आले होते. बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

त्यांना सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षकांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता फडणवीस यांनी पटोले यांचे थेट नाव न घेता त्यांचा उल्लेख कांगावेखोर असा केला.

त्यांनी पटोले यांच्या विधानाचा समाचाार घेत केंद्राने राज्याला कशी व किती मदत केली, याचा पाढाच वाचला. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.संजय कुटे, आ. गोर्वधन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार हरीश पिंपळे आदी उपस्थित होते.


केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर्स अनेक ठिकाणी सुरू
केंद्र सरकारने पाठलेले व्हेंटिलेटर्स राज्यात पडून होते. अनेक दिवस तर पॅकिंगच उघडण्यात आले नाही. परिणामी काहींमध्ये दुरुस्तीचे काम निघाले. तंत्रज्ञ पोहोचलेल्या ठिकाणचे व्हटिलेटर्स सुरू झाले आहेत. मात्र देखभाल दुरुस्ती जबाबदारी राज्य सरकाराची होती. काही ठिकाणी केंद्र सरकारने पाठविले व्हेंटिलेटर्स सुरू आहेत. अकोल्यातही तंत्रज्ञ पोहोचले आहेत, येथील व्हेंटिलेटर्सही सुरू होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संपादन - विवेक मेतकर

Devendra Fadwanis criticizes Congress state president Nana Patole in Akola