Akola News : फेब्रुवारीचा पहिला आठवडा सुद्धा ‘हुडहुडी’ भरविणाराचा राहणार ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Cold
अकोला : फेब्रुवारीचा पहिला आठवडा सुद्धा ‘हुडहुडी’ भरविणाराचा राहणार !

अकोला :फेब्रुवारीचा पहिला आठवडा सुद्धा ‘हुडहुडी’ भरविणाराचा राहणार!

अकोला : तीन दिवसांपासून अकोल्यासह विदर्भात पारा घसरला असून, किमान तापमान ८ ते ९ अंशावर पोहचले आहे. फेब्रुवारीचा पहिला आठवडा सुद्धा ‘हुडहुडी’ भरविणाराचा राहणार असून, पारा ६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान विभागाद्वारे वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांनी मानले PM मोदींचे आभार

एरव्ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच हिवाळ्याची चाहूल लागते व नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सर्वाधिक थंडी जाणवते. अकोल्यासह विदर्भात तर, हिवाळ्यात किमान तापमान पातळी ९ ते १२ अंशसेल्सिअपर्यंत नोंदली जाते. यावर्षी मात्र, हिवाळ्यातील गुलाबी थंडीने दांडी मारत अकोल्यासह विदर्भातील नागरिकांचा, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला होता. २० डिसेंबरपासून मात्र, दोन ते तीन दिवस हुडहुडी भरवणारी व दिवसाही गारठा असणारी थंडी अकोलेकरांनी अनुभवली. त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणाची निर्मिती होऊन थंडी लुप्त झाली.

तापमानातही काहीअंशी वाढ झाल्याने पुन्हा गुलाबी थंडीच्या हेल्दी सिझनसाठी प्रतीक्षा वाढली. परंतु, दोन दिवसांपासून थंडीने मुसंडी मारली व बुधवारी (ता.२६) किमान ९.३ अंश सेल्सिअसची अकोल्यात नोंद झाली. हवामान अभ्यासकांच्या मते उत्तरेकडे सुरू असलेली बर्फवृष्टी व वाहणारे थंड वारे परिणाम स्वरुप सोमवापासून विदर्भासह महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून, न्यून्यतम तापमानासह हुडहुडी भरवणारी थंडी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहू शकते.

हेही वाचा: ..अन् CM ठाकरेंनी PM मोदींचे मानले आभार

हरभरा उत्पादकांना दिलासा

रब्बी हंगामाकरिता थंडीचे विशेष महत्त्व आहे. त्यातही हरभरा पिकाला थंडी अधिक पोषक असून, जेवढी थंडी अधिक तेवढे पीक जोमदार व उत्पादन अधिक मिळते. त्यामुळे सोमवारपासून सुरू झालेल्या थंडीच्या लाटेमुळे हरभरा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

नागपूरात पारा ८.३ अंशावर

शीत लहरिचा सर्वाधिक परिणाम विदर्भात नागपूरात जाणवला असून, २६ जानेवारी रोजी नागपूरात किमान ८.३ अंशसेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल बुलडाणा ८.८, गोंदिया ८.८ व वर्ध्यात ९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

हेही वाचा: पुण्यातील पहिलं पिझ्झा ATM; पाहा व्हिडिओ

आर्द्रतेचा टक्का मात्र कायम

एरव्ही थंडी, गारवा वाढला की आर्द्रतेचा टक्का कमी होतो व ओठ, त्वचा फाटने असे हिवाळ्याचे संकेतांक दिसायला लागतात. मात्र, यावर्षी हिवाळ्यात आर्द्रतेचा टक्का ५० पेक्षा आतापर्यंत कमी झाला नसून, अजूनही तो ५९ ते ७५ टक्के असल्याची नोंद आहे.

उत्तरेकडील प्रदेशात सध्या ऊने तापमान असून, मोठ्या प्रमाणात बर्फवृषी सुरू आहे. त्याचा व या भागातून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे विदर्भात पुन्हा थंडीची लाट पसरली आहे. ही लाट आठवडाभर राहण्याची शक्यता असून, काही भागात पारा ५ ते ७ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

Web Title: First Week February Will Also Coldest Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top