In Khamgaon, the city council team took action against the shopkeeper selling vegetables and fruits.jpg
In Khamgaon, the city council team took action against the shopkeeper selling vegetables and fruits.jpg

साहेब! वजन काट्याला हात लावू नका; न. प. पथकाच्या कारवाईवेळी व्यापाऱ्यांनी घातला वाद

खामगाव (बुलडाणा) : जिल्ह्यासह खामगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्‍यामुळे सध्या सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सर्व व्‍यापारी आस्‍थापनांना जिल्‍हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. परंतु शुक्रवारी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने शनिवार, रविवार कडक लॉकडाउनसंदर्भात आदेश काढण्यात आला.

दोन तासातच तो रद्ददेखील केला. त्‍यामुळे अनेक व्‍यापारी संभ्रमात होते. शेवटी दोन्‍ही दिवस नेहमीप्रमाणे सुरू राहील, याची खात्री पटल्‍यावर व्‍यापाऱ्यांनी दोन्‍ही दिवस आपली दुकाने सुरू ठेवली. दरम्‍यान घाटपुरी नाका परिसरात रविवारी (ता. १४) काही शेतकरी व व्‍यापाऱ्यांनी आपली भाजीपाला व फळविक्रीची दुकाने थाटली असता न. प. पथकाच्‍या वतीने त्‍यांच्‍यावर कारवाई करण्यात आली. यावेळी काही व्‍यापाऱ्यांचे वजन काटेदेखील जप्‍त करण्यात आल्‍याची माहिती असून यावेळी शेतकरी व पथकातील अधिकाऱ्यांमध्ये ‘तू तू मै मै’ झाली.

बार्शीटाकळीत ‘वैध’ धंद्यांना लाकडाऊन; ‘अवैध धंदे खुलेआम ! 
 
जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात शनिवार सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाउन व संचारबंदीचे आदेश जारी केले होते. मात्र लगेच शुक्रवार सायंकाळपासून हा आदेश लागू करण्यात आल्याचे शुद्धिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशावर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन रस्त्यावर धावले होते. त्यावेळीही व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांची धांदल उडाली होती. याचा प्रत्यय आज रविवारीसुद्धा दिसून आला.

मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या तडकाफडकी निर्णयामुळे या आठवड्यातसुद्धा असेच काही होईल, याबाबत व्यावसायिक व नागरिकांना याची कल्पना आली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नागरिकांनी सुरू केली होती. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या दिवशी शनिवार (१३ मार्च ते सोमवार १५ मार्च) सकाळपर्यंत लॉकडाउन व संचारबंदीचे आदेश जारी झाले होते. मात्र लगेच शुक्रवारी दुपारी शनिवार व रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्वीच्या आदेशाप्रमाणे निर्बंध नसलेली दुकाने सुरू राहतील, अशा आशयाचे जिल्हा प्रशासनाचे शुद्धिपत्रक धडकले.

काळाच्या ओघात गोंधळ कला लोप पावतीय; कोरोना संसर्गानेही बसला कलावंतांना फटका
 
त्यामुळे नेहमीप्रमाणे शहरातील टिळक मैदान व कोरोनामुळे स्थलांतरित घाटपुरी रोडवरील भाजीबाजार रविवारी (ता. १४) नेहमीप्रमाणे गजबजला. त्‍यामुळे न. प. पथकाने पोलिसांच्या ताफ्यासह घाटपुरी रोडवरील भाजीबाजारात धावाबोल करून कारवाईला सुरुवात केली. एका भाजी विक्रेत्याने सुमारे ५ हजार रुपये किमतीचा वजनकाटा जप्त करण्यात आल्याची तक्रार प्रस्तुत प्रतिनिधीजवळ केली. त्‍यामुळे शासनाने सर्व बाबींचा विचार करूनच आदेश काढावेत, असे मत व्‍यापारी व सामान्‍य जनतेकडून व्यक्‍त होत आहे. 

मागील रविवारी प्रशासनाच्‍या वतीने संपूर्ण लॉकडाउन असल्‍याची घोषणा करण्यात आली होती. त्‍यामुळे याठिकाणी कोणीही दुकाने थाटली नाहीत. परंतु आज अशा कुठलीही सूचना न. प.ने दिली नसल्याने आम्‍ही शेतकऱ्यांनी व व्‍यापाऱ्यांनी दुकाने लावली. मात्र न. प.कर्मचाऱ्यांनी दुकाने ताबडतोब उचलण्याची तंबी दिली. त्‍यामुळे आमची वेळेवर धांदल उडाली. तसेच मालाची विक्री न झाल्‍याने आर्थिक नुकसानदेखील सहन करावे लागले. 
- मीनाक्षी सांगळे, शेतकरी, टाकळी विरो. 

लॉकडाउनचा कार्यकाळ हा दिवसेंदिवस वाढतच असल्‍याचे आमच्‍यावर उपासमारीची वेळ आली आहे. नियमित सुरू असलेले व्‍यवसाय बंद झाले असून पर्यायी मार्ग म्‍हणून प्रसंगी कर्ज काढून मी फळविक्रीचा व्‍यवसाय सुरू केला; परंतु त्‍यातही शासनाच्‍या वेळोवेळी बदलत असलेल्‍या भूमिकेमुळे मालाची मुद्दलदेखील निघणे कठीण झाले आहे. 
- गजानन लक्ष्मण चोपडे, फळविक्रेता, अभयनगर, खामगाव. 

शनिवार, रविवार सर्व नियमितपणे सुरू राहणार याचा काही नागरिकांनी वेगळाच अर्थ काढून गैरसमज केला. त्‍यामुळे घाटपुरी नाका परिसरात आलेले शेतकरी व व्‍यापाऱ्यांनी आपली दुकानेदेखील थाटली. परंतु तेथे होत असलेली गर्दी पाहता पालिका प्रशासनाच्‍या वतीने दंडात्‍मक कारवाई करण्यात आली आहे. 
- मनोहर आकोटकर, न. प. मुख्याधिकारी, खामगाव.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com