जन्मतारखेचे प्रमाणपत्र असल्याशिवाय अर्ज करता येणार नाही, असे सांगितले आहे. जन्म तारखेची नोंद आधार कार्डवर असल्याने जन्म तारखेच्या दाखल्याची आवश्यकता काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मालेगाव : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची वेबसाईट बंद असल्याने या योजनेच्या लाभापासून अनेक बहिणी वंचित राहणार आहेत. या योजनेच्या अर्जासाठी जी वेबसाईट दिली होती, ती आता बंद आहे. तसेच त्यात अनेक अडचणी येत आहेत.