अकोला जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के

बार्शीटाकळी जवळ काल सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून, मालमत्तेचे वा कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही
Mild earthquake in Akola district  Disaster Management Cell
Mild earthquake in Akola district Disaster Management Cellesakal

अकोला : बार्शीटाकळी जवळ (अकोला शहरापासून २३ किमी अंतरावर) काल सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून, मालमत्तेचे वा कोणतीही  जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, हवामान विभाग अकोलाचे वैज्ञानिक सहायक मिलिंद धकिते व कार्तिक वनवे यांनी याबाबत भारतीय सेस्मॉलॉजीकल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या आधारे माहिती दिली आहे.

काल सायंकाळी पाच वाजून ४१ मि.१८ सेकंदांनी या धक्क्याची नोंद झाली. २०.५३०N व ७७.०८०E या अक्षांश रेखांशावर हे केंद्र असून रिक्टर स्केल वर ३.५० इतकी तीव्रता नोंदविण्यात आली. या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही,असे प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

Mild earthquake in Akola district  Disaster Management Cell
हकालपट्टीनंतर कुलदीप बिश्नोईंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'कॉंग्रेसमध्ये...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com