Akola News : ...तर आंबेडकरांची असणार एकला चलो रे ची भूमिका

वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या सात जागांवरील प्रस्तावाला काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. मंगळवारी दुपारी मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली.
not getting any response from Congress to seven seat proposal by Vanchit Bahujan Aghadi Adv Prakash Ambedkar
not getting any response from Congress to seven seat proposal by Vanchit Bahujan Aghadi Adv Prakash Ambedkar Sakal

Akola News : वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या सात जागांवरील प्रस्तावाला काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. मंगळवारी दुपारी मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली. शिवाय त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही पत्र लिहले होते.

अकोला लोकसभा मतदारसंघात वंचिततर्फे अॅड. प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवतील असे जाहिर करण्यात आले होते. मात्र मागील आठवडाभरातील घडामोडीनंतर व महाविकास आघाडीसोबत वंचितला घ्यायचे की नाही हा प्रश्न निरुत्तरीच असल्याने आंबेडकरांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली भूमिका मांडणे सुरु केले.

राज्यात सात जागांवर वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला मदत करेल असा खुलासा त्यांनी केला. शिवाय भारत जोडो यात्रेदरम्यान राहूल गांधी यांची भेट सुद्धा त्यांनी घेतली होती. मात्र त्या भेटीत त्यांना काहीच हाती आले नाही. राहूल यांच्यासोबत त्यांची राजकीय चर्चा होवू शकली नाही. त्यामुळे काँग्रेससोबतची आघाडी होण्यात अडथळा निर्माण झाल्याचे वास्तव आहे. शिवाय काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीकडूनही त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.

जर काँग्रेससोबत वंचितची आघाडी नाही झाली तर अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अर्ज भरल्यापासून ते अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंतही अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे.

यामध्ये जर महाविकास आघाडीने काँग्रेसकडून डाॅ. अभय पाटील किंवा शिवसेना (उबाठा) कडून माजी आमदार गजानन दाळू गुरूजी तसेच आमदार नितीन देशमुख किंवा राष्ट्रवादीकडून माजी आमदार तुकाराम बिडकर यांना उभे केले तर वेळेवर महाविकास आघाडीचा उमेदवार आपला अर्ज मागे घेवू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com