अकोला : पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढली!

आणखी ३२ जणांना संसर्ग; नागरिकांची बेफिकिरी सुरूच
Corona
Coronasakal

अकोला : गत तीन दिवसांत अकोला जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी (ता.५) आणखी ३२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतरही शहरासह जिल्हाभर नागरिकांची बेफिकिरी सुरूच असून, बाजारपेठेसह सर्वत्र विनामास्क गर्दी होताना दिसत आहे.(Corona in Akola district)

Corona
माईंच्या जाण्याने हजारोंचे मातृछत्र हरपले ; प्रभाकर देशमुख

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून बुधवारी कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ४६७ अहवाल प्राप्त झाले. त्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. याशिवाय खाजगी लॅब मधून ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. काल (दि.४) रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात २१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यातील २० जण हे अकोला शहरातील तर एक जण मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. खाजगी लॅबच्या अहवालात ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.(akola news)

Corona
भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण ८४ जणांवर

नवीन वर्षाची सुरुवात होताना अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक आकडी होती. मात्र, गत काही दिवसांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गत तीन दिवसांतच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८४ वर पोहोचली आहे.

मनपा क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण

अकोला महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. असे असतानाही अकोला महानगरपालिका प्रशासनातर्फे अद्याप प्रतिबंध करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. रुग्ण संख्येचा विस्फोट होईपर्यंत प्रशासन हातावर हात धरून बसणार आहे का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

Corona
भारतातील ओमिक्रॉनचा पहिला बळी पिंपरी-चिंचवडमध्ये

सज्ज रहा, सतर्क रहा, काळजी घ्या!

कोरोनाचं संकटं पुन्हा एकदा उभं झालंय; या संकटाच्या काळात अकोला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सर्वच स्तरावर सज्ज असायला हवी. प्रशासनाने तातडीने सर्व उपलब्ध आरोग्य व्यवस्था, उणिवा आणि नियोजन यासाठी युद्ध पातळीवर कामाला लागावे; जेथे सरकार कमी पडेल तेथे लोकप्रतिनिधी पुढे येतील, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येत्या काळात परिपूर्ण असावेत; व्हेंटिलेटर, ऑक्सीजन काँसन्ट्रेटर, रुग्णवाहिका, पिपिई किट्स, ऑक्सिजन प्लांट इत्यादी अत्यावश्यक सेवांची सद्यस्थिती काय आहे आणि कोणत्या तालुक्यात कशाची कमतरता आहे याबाबत प्रशासनाने तातडीने आढावा घेण्याची सूचना आमदार सावरकर यांनी केली.

जिल्ह्यात अशी वाढली रुग्णसंख्या

  • १ जानेवारी -दोन

  • २ जानेवारी - एक

  • ३ जानेवारी - १०

  • ४ जानेवारी -२८

  • ५ जानेवारी - ३२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com