esakal | तिसऱ्या लाटेची तयारी; एक ऑक्सिजन प्लांट तयार, दोनचे काम युद्धस्तरावर
sakal

बोलून बातमी शोधा

 ऑक्सिजन

तिसऱ्या लाटेची तयारी; एक ऑक्सिजन प्लांट तयार, दोनचे काम युद्धस्तरावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाच्या दोन लाटा ओसरल्यानंतर संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात युद्ध स्तरावर कृत्रिम ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी महाजेनकोकडून सर्वोपचार रुग्णालयात उभारण्यात आलेला प्लांट तयार झाला असून जिल्हा वार्षिक योजना (डीपीसी) व सीएसआर फंडातून मंजुर करण्यात आलेल्या प्रत्येकी एका ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धस्तराव सुरू आहे. सदर दोन्ही प्लांट या महिन्याच्या शेवटपर्यंत संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना विरोधात लढा देण्यासाठी तयार होतील. (Preparation for the third wave; Build an oxygen plant)

कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेमध्ये रुग्णांमध्ये ताप, खोकल्यासह इतर सामान्य लक्षण दिसत होते. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाचा लवकरच शोध लागत होता. परंतु पहिल्या लाटेनंतर जानेवारी, फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान कोरोना बाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले. शरीरातील ऑक्सिजन पातळी ज्याला एसपीओ-२ पातळी असे म्हणतात. ही पातळी ९५ ते १०० पर्यंत सामान्य समजली जाते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सामान्य दिसणाऱ्या रुग्णांमध्ये ही पातळी ९५ ते ९० पर्यंत ही गेल्याचे दिसून आले.

हेही वाचा: मध्यरात्री स्‍मशानभूमित अघोरी पुजा; मांत्रिकांसह युवकावर कारवाई

त्यामुळे शरीरातील प्राणवायूची पातळी कमी झाल्यामुळे रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावे लागले. बहुतांश रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज निर्माण झाल्याने ऑक्सिजनसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागली. त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालये ऑक्सिजनच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याची योजना आखली. त्यानुसार स्थानिक सर्वोपचार रुग्णालयात तीन कृत्रिम ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी एक प्लांट तयार असून दुसरा पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे, तर तिसऱ्याचे प्राथमिक काम पूर्ण झाले असून तो लवकरच उभारण्या येईल.

हेही वाचा: अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दीएकाच दिवशी मिळणार ४५० सिलींडर ऑक्सीजन
सर्वोपचार रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेल्या महाजेनकोच्या प्लांटमधून तब्बल १५० जम्बो सिलींडरमध्ये ऑक्सिजन एका दिवशी तयार होईल. त्यासोबतच वार्ड क्रमांक २८ जवळ डीपीसी व अपघात कक्षाजवळ सीएसआर फंडातून उभारण्यात येत असलेल्या प्लांटमधूनही प्रत्येकी १५० जम्बो सिलींडरमध्ये ऑक्सिजन साठवता येईल.

हेही वाचा: Success Story; योगेशच्या पेढ्याला राज्यभरासह राज्याबाहेरही मागणीअशी आहे ऑक्सिजन प्लांटची सद्यस्थिती
- महाजनेकोकडून महिला प्रसुती विभागाजवळ उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट तयार आहे. त्याची तपासणी पूर्ण झाली असून तो उद्घघाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
- जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) वार्ड क्रमांत २८ जवळ उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक टीन शेड तयार आहे. त्यामध्ये आवश्यक यंत्रसामग्री सुद्धा पोहचली आहे. विद्युत पुरवठ्याची व्यवस्था झाल्यानंतर यंत्रसामग्री लावून प्‍लांट सुरू करण्यात येईल.
- तत्कालीन मुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी अकोला दौऱ्यावर असताना रुग्णालयात कॉरपोरेट सोशल रेस्‍पॉन्‍सीबिलिटी अर्थात सीएसआर फंडातून कृत्रिम ऑक्सिजनचा प्लांट मंजुर केला होता. सदर प्लांट रुग्णालयातील अपघात कक्षाजवळ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री रुग्णालयात गत आठवड्यात दाखल झाली असून प्लांटसाठी आवश्यक फाउंडेशन तयार करण्यात आले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Preparation for the third wave; Build an oxygen plant

loading image