पाऊस येईल का? सरकार कापूस घेईल का?...20 हजार शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून

cotton 3.jpg
cotton 3.jpg

अकोला : पावसाळा सुरू झाला परंतु, अजूनही जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया रेंगाळलेली असून, नोंदणी केलेल्यांपैकी 19 हजार 291 शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होणे बाकीच आहे. अजूनही खरेदी प्रक्रियेला गती आलेली नसल्याने, घरात पडलेल्या कापसाचे काय होणार, या चिंतेने जिल्ह्यातील कापूस उत्पादक कासाविस झालेला आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात एक लाख 52 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कापूस पेरणी झाली होती. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व काही प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा कपाशीला फटका बसला. पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट आली असली तरी, सरासरी आठ ते पंधरा क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले. खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारीचे पीक आधिच अतिवृष्टीच्या तडाख्यात उद्‍ध्वस्त झाल्याने, शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षा कापसावरच होत्या. परंतु, जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्रांच्या उदासीन खरेदी प्रक्रियेमुळे त्यांचेवर सुद्धा पाणी फिरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सीसीआय व कॉटन फेडरेशनमार्फत हमीभावाने कापूस खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्यंतरी ती बंद पडली होती. काही कालावधीनंतर पुन्हा केंद्र सुरू करण्यात आले मात्र, सर्वच केंद्रावर अतिशय संथ गतीने खरेदी प्रक्रिया राबविली जात असून, विविध अटीशर्ती, निकषांचाही पाढा वाचला जात असल्याने, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाचीही खरेदी या वर्षी होणे शक्य दिसत नाही.

आठवडाभरात खरेदी पूर्ण करा
ज्या कापूस खरेदी केंद्रांनी आतापर्यंत कोरड्या वातावरणात जलद गतीने कापूस खरेदी केली नाही, ते आता पाऊस सुरू झाल्यानंतर काय करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला असून, या आठवड्यात संपूर्ण शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी प्रक्रिया केंद्रांनी पूर्ण करावी, अशी मागणी शेतकरी संघटानांनी केली आहे.

सीसीआय मार्फत जिल्ह्यात 8 जूनपर्यंत झालेली कापूस खरेदी

खरेदी केंद्र शेतकरी संख्या कापूस (क्विंटल) बाकी शेतकरी
अकोला 5290 1,61,207 5224
अकोट 8034 3,17,868 4126
तेल्हारा 4658 1,22,915 2570
बाळापूर 3424 88,916 2322
पातूर 2265 57,609 1219
बार्शीटाकळी 8664 2,33,122 0000
मूर्तिजापूर 716 21,847 2456
एकूण 33,051  10,03,484  17,917

फेडरेशन मार्फत जिल्ह्यात 8 जूनपर्यंत झालेली कापूस खरेदी

खरेदी केंद्र शेतकरी संख्या कापूस (क्विंटल) बाकी शेतकरी
अकोला 4605 1,33,122 589
तेल्हारा 865 20,635 785
एकूण 5470 1,53,757 1374

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com