esakal | कोरोना लसींचा पुन्हा अल्प पुरवठा; ११ हजार ४०० डोस मिळाले
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना लस

कोरोना लसींचा पुन्हा अल्प पुरवठा; ११ हजार ४०० डोस मिळाले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्याला शनिवारी (ता. १०) कोरोनाच्या केवळ ११ हजार ४०० लसींचा (डोस) पुरवठा आरोग्य विभागामार्फत करण्यात आला. सदर लसींचा साठ्यातून केवळ तीन-चार दिवसच लसीकरण करता येऊ शकेल. त्यानंतर मात्र पुन्हा कोरोना लसीकरणाचा वेग मंदावेल. त्यामुळे जिल्ह्याच्या नशीबी सुरु असलेल्या लसींच्या अल्प पुरवठ्याची बोळवण संपता संपत नसल्याचे वास्तव आहे. (Re-supply of corona vaccines; 11,400 doses were received)

हेही वाचा: मध्यरात्री स्‍मशानभूमित अघोरी पुजा; मांत्रिकांसह युवकावर कारवाई

कोरोना विरुद्धच्या महामारीवर विजय मिळवण्यासाठी देशासह जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहे. त्यानंतर लसीकरणाची गती वाढवण्यासाठी केंद्र शासनाने १८ वर्षावरील लाभार्थ्यांसाठी लसीकरणाची मोहीम खुली केली. परंतु जिल्ह्यात लसींचा अल्प साठा मिळत असल्याने सदर मोहिमेत नेहमीच खंड पडत आहे. दरम्यान शनिवारी (ता. १०) जिल्ह्यासाठी कोरोना लसींचे ११ हजार ४०० डोज मिळाले. सदर साठा अल्प असल्याने जिल्ह्यात पुन्हा लसीकरणाचा वेग मंदावेल.

हेही वाचा: अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दी


असे मिळाले डोज
- कोव्हिशिल्ड - ९ हजार डोज
- कोव्हॅक्सीन - २ हजार ४०० डोज

हेही वाचा: Success Story; योगेशच्या पेढ्याला राज्यभरासह राज्याबाहेरही मागणी


अल्प साठ्यामुळे गती मंद
जिल्ह्यासाठी कोरोना लसींचा केंद्र व राज्य शासनाकडून अल्प प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. त्याचा विपरीत परिणामा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर सुद्धा होताना दिसून येत आहे. परिणामी लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या १५१-१५० केंद्रांपैकी मेजक्याच केंद्रांवर नियमित लसीकरण करण्यात येते. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवण्यासाठी त्याचा पुरवठा अधिक करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Re-supply of corona vaccines; 11,400 doses were received

loading image