शेतकऱ्यांचे देवाला साकडे; फक्त सोयाबीनचे भाव घसरू देऊ नको!

शेतकऱ्यांचे देवाला साकडे; फक्त सोयाबीनचे भाव घसरू देऊ नको!

अकोला : कधी नव्हे तो गेल्यावर्षी सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक व आजपर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला. हंगामअखेर तर नऊ हजारापर्यंत भाव पोहोचले. अजूनही बाजारसमितीमध्ये प्रतिक्विंटल सात ते आठ हजार रुपये भाव मिळत आहे. देवा, यंदाही कृपा राहू दे आणि नवीन सोयाबीन निघेपर्यंत भाव घसरू देऊ नको, असे साकडे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक सध्या देवाला घालत आहेत. (Soybean-Farmers-Prayer-to-God-More-than-guaranteed-price-nad86)

शेतमालाला मिळणारा कमी भाव, शेतकरी आत्महत्येचे एक प्रमुख कारण ठरले आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक, अनैसर्गिक संकटात सापडून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आले आहे. त्यानंतरही हाती आलेल्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या शेतकऱ्याला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले आहे.

शेतकऱ्यांचे देवाला साकडे; फक्त सोयाबीनचे भाव घसरू देऊ नको!
दर १० मिनिटाला हलतो पाळणा, वर्षाला ५० हजार दाम्पत्याकडे ‘गुड न्यूज'

अपार कष्ट करून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून कित्येक वर्षांपासून शेतकरी झगडत आहे. त्यातही जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा व उत्पादन होत असल्याने किमान सोयाबीनला तरी चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी आग्रही असतात. मात्र, दरवर्षी त्यांचा हिरमोड होतो. गेल्यावर्षी मात्र, जिल्ह्यात सोयाबीनचे जवळपास निम्मे उत्पादन घटले. शिवाय इतर राज्यात व देशातही सारखीच स्थिती असल्याने कधी नव्हे तो हमीभावापेक्षा अधिक व आतापर्यंतचा सर्वोधिक (प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये) भाव सोयाबीनला बाजारसमित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळाला.

आताही सात ते आठ हजार रुपये भाव मिळत आहे. मात्र, बाजार समितीमध्ये आवक वाढताच भाव घसरण होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतु, गेल्यावर्षी झालेली भाववाढ यावर्षी सुद्धा कायम राहील, या अपेक्षेणे शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात सर्वाधिक दोन लाख दहा हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली आहे. पिकांची स्थितीही सध्या चांगली असून, भरघोस उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, नवीन पीक निघेपर्यंत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव कायम राहावे, असे साकडे शेतकरी देवाकडे घालत आहेत.

शेतकऱ्यांचे देवाला साकडे; फक्त सोयाबीनचे भाव घसरू देऊ नको!
अमानुष प्रकार! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा
गेल्या हंगामात सोयाबीनचे नऊ हजार रुपयांपर्यंत भाव गेले. यावर्षीही चांगला भाव मिळेण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचा पेरा वाढवला आहे. यावर्षी अपेक्षेनुसार उत्पादन झाले व भाव मिळाला तर पाच-सहा वर्षांपासून होत आलेले नुकसान काही प्रमाणात भरून निघू शकते.
- उमेश चिलवंते, शेतकरी, कानशिवनी

(Soybean-Farmers-Prayer-to-God-More-than-guaranteed-price-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com