accident esakal
Nagpur_old

Accident News: दुर्दैवी! भंडारा-बालाघाट महामार्गावरील भीषण अपघात; ट्रकची ट्रॅक्टरला धडक, चालक ठार

दोघे गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

️सिहोरा: भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर, दोघे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तुमसरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही घटना आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास सिंदपुरी गावालगत घडली. मृत चालकाचे नाव कन्हैयालाल रहांगडाले (वय ५५ रा. मच्छेरा) अस आहे. तसेच जखमींमध्ये नावे निखिल पटले (वय १७) व पांडुरंग धारणे (वय ५८) यांचा समावेश आहे.

मच्छेरा येथील कन्हैयालाल रहांगडाले हा ट्रॅक्टरचा चालक-मालक अाहे. आज पहाटे तो चुल्हाडवरून गुरांसाठी चारा म्हणून तनस आणण्याकरिता ट्रॅक्टरने इतर दोघांसोबत जात होता.

सिंदपुरी गावाजवळ मागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रॅकने त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, यात ट्रॅक्टरचा चेंदामेंदा होऊन इंजिनचे तुकडे तुकडे झाले आहेत.

या अपघातात चालक कन्हैयालाल रहांगडाले यांचा जागीच मृत्यू झाला तर, सोबत असलेले दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या ️घटनेची माहिती होताच सिहोरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार नीलेश गोसावी आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी जखमींना तातडीने तुमसर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास बिट अंमलदार मुलचंद मेश्राम हे करीत आहेत. परिसरातील नागरिकांनी अपघातातील अज्ञात वाहनावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT