grapes
grapes 
अ‍ॅग्रो

द्राक्ष बाजारात यंदा तेजीचे संकेत

ज्ञानेश उगले

यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या तुलनेत राज्याच्या द्राक्ष शिवारात संथ हालचाली आहेत. हिवाळा सुरू होऊनही आत्तापर्यंत थंडी नव्हती. ही स्थिती द्राक्षाची गुणवत्ता वाढण्यासाठी उपयुक्तच ठरली आहे. पावसाच्या तडाख्यातून काही प्रमाणात वाचलेल्या द्राक्षबागांना हाच काय तो दिलासा मिळत आहे. अर्लीच्या द्राक्षांत ५५ टक्के उत्पादन घटल्यामुळे व नंतरच्या द्राक्षांना गुणवत्ता असल्याने यंदा द्राक्ष बाजारात सुरुवातीला तरी तेजीचा माहोल राहील असे दिसते. मागील वर्षी जानेवारीत आपल्याकडे जास्त आवक असताना युरोपीय बाजारातही दक्षिण आफ्रिका, पेरू येथील द्राक्षांची बंपर आवक होती. त्यामुळे परिस्थिती अवघड बनली होती. यंदा तशी गर्दी नसल्याने भारतीय मालाला चांगला उठाव राहील अशी स्थिती आहे.

थंडीमुळे पक्वता कालावधी वाढणार
मागील वर्षी १ जानेवारीला सुरू झालेला हंगाम यंदा १ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. नाशिक व सांगली भागांतील तुरळक प्लॉटची खुडणी सुरू आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात द्राक्षांना सरासरी प्रतिकिलो ५० रुपये तर निर्यातक्षम द्राक्षांना सरासरी १०० रुपये दर मिळाले. अजून ३ ते ४ आठवड्यांनी हंगामाला गती येईल. चांगल्या गुणवत्तेच्या द्राक्षांना अजून दोन महिन्यांपर्यंत म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत तरी चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. थंडीचे प्रमाण येत्या काळात वाढेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे पक्वतेचा व पर्यायाने खुडणीचा टप्पाही लांबणार आहे.

अर्लीच्या बागांना फटका
यंदा नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे या चारही विभागातील ‘अर्ली’च्या द्राक्षांना पावसाचा जबर तडाखा सहन करावा लागला आहे. या बागांचे ५५ ते  ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. उरलेले पीकही पुरेशा स्थितीत नसल्याने अजून तरी बाजारात शांतताच आहे. डिसेंबर (२०१९) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या टप्प्यातील द्राक्षांना देशांतर्गत बाजारासाठी प्रतिकिलो ५० ते ७० रुपये व सरासरी ६० रुपये दर मिळाले. रशिया, मलेशिया, हाँगकाँगला निर्यात होणाऱ्या द्राक्षांना प्रतिकिलो ९० ते ११० रुपये व सरासरी १०० रुपये दर मिळाले.

निर्यात आस्ते कदम..
मागील वर्षी १ जानेवारीपर्यंत भारतातून रशियाला दीड हजार कंटेनरची निर्यात झाली होती. यंदा ती अवघी शंभरच्या आसपास आहे. युरोपीय बाजारपेठेत मागील वर्षी आतापर्यंत ५१ कंटेनर रवाना झाले होते. २ जानेवारीला नाशिकच्या ‘सह्याद्री फार्म्स’ने पहिला कंटेनर पाठवला आहे.

गुणवत्ता टिकविण्याचे आव्हान
राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक व उत्पादक निर्यातदार माणिकराव पाटील यांच्या म्हणण्यानुसार पावसाच्या तडाख्याने ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांतील गोड्या बहराची छाटणी झालेल्या बहुतांश द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्टोबर छाटणीतील द्राक्षबागांची सर्व विभागातील स्थिती चांगली दिसत आहे. त्यांना चांगले दर मिळण्याची शक्यताही दिसत आहे. एकंदर एप्रिल अखेरपर्यंत हंगाम चांगला जाईल. मार्च महिन्यात आवक वाढण्याची शक्यता आहे. या स्थितीत योग्य प्रमाणात ‘ॲसिड शूगर रेशो’ सांभाळून चांगली चव देण्यावर भर देणे आवश्यक आहे.

अवशेषमुक्त उत्पादनावर भर हवा
इंडियन ग्रेप एक्स्पोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे म्हणाले, की पक्वतेच्या टप्प्यातील बदलते हवामान पाहता भुरी रोग व मिलिबग ही कीड त्रास देण्याची शक्यता आहे. या स्थितीत प्रमाणित जैविक उपायांनी या कीडरोगाचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. तसेच निर्यातक्षम तसेच देशांतर्गत बाजारासाठीही संपूर्ण अवशेषमुक्त द्राक्ष पुरवण्यावरच भर दिला पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे.

जागतिक द्राक्ष बाजाराची स्थिती  
मागील वर्षी हवामान बदलाचा, नैसर्गिक आपत्तीचा फटका भारतीय द्राक्षशेतीलाच नव्हे तर जगातील सर्वच द्राक्ष उत्पादक देशांना बसला आहे. परिणामी दक्षिण आफ्रिका, पेरू, चिली या देशांच्या द्राक्ष उत्पादनात काही प्रमाणात घट असल्याचे रिपोर्टस आहेत. चिलीचा हंगाम सुरू असून जानेवारीत येथील माल वाढणार आहे. चिलीसाठी उत्तर अमेरिका हे मार्केट असल्याने भारताला चिलीची अडचण येणार नाही. दक्षिण आफ्रिकेत डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्याचा तेथील उत्पादनाला फटका बसला. आफ्रिकेतील खुडणी हंगाम जानेवारीत आटोपेल.  नामिबिया या देशाचा हंगाम छोटासाच असून तो संपण्याच्या मार्गावर आहे. इटली, स्पेन, ग्रीस या देशांतील द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे.

ऑस्ट्रेलियाचा दबदबा  
जागतिक द्राक्ष बाजारात ऑस्ट्रेलियाचा दबदबा वाढत आहे. चांगली मागणी असलेले द्राक्षांचे नवीन वाण ही ऑस्ट्रेलियाची जमेची बाजू आहे. भारताचा आणि ऑस्ट्रेलियाचा माल एकाच वेळी म्हणजे फेब्रुवारी, मार्च या दरम्यान बाजारात येतो. चीन, इंडोनेशिया, तैवान, सिंगापूर, उत्तर अमेरिका ही ऑस्ट्रेलियाची मार्केट आहेत.

अमेरिकेचा मोठा हंगाम
अमेरिकेचा स्वत:चा द्राक्षमाल हा वर्षातील नऊ महिने बाजारात असतो. जुलै ते ऑक्टोबर हा अमेरिकेत द्राक्षांचा काढणी हंगाम असतो. तर, पुढील चार महिने स्टोरेजचा माल चालवला जातो. नोव्हेंबरपासून अमेरिकेत ब्राझिल, चिलीचा माल सुरू होतो. त्यामुळे युरोप मार्केटवरील दाब कमी होतो. या वर्षीची स्थिती पाहता यंदा अमेरिकेत स्टोरेजमधील द्राक्षमाल कमी आहे. त्यात चिलीतील हंगाम लवकर आटोपणार आहे. याचाही लाभ भारताला मिळणार आहे.

भारतीय द्राक्षांचा सर्वाधिक भर हा युरोपच्या बाजारावर आहे. दरवर्षी ख्रिसमसच्या सणानंतर पहिले एक-दोन आठवडे मागणी कमी असते. नंतर ती वाढत जाते. त्याच वेळी आवकही वाढत जाते. मागील वर्षी तर याच काळात भारतात व युरोपीय बाजारातही माल मोठ्या प्रमाणात वाढला होता. सुदैवाने यंदा तशी परिस्थिती नसल्याने भारतीय हंगामाची सुरुवात उत्साहवर्धक होईल असे दिसते.
- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT