अ‍ॅग्रो

भारतात भुईमूग उत्पादन सात दशलक्ष टनांवर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पीक क्षेत्रात झालेली वाढ अाणि उत्पादकतेत सुधारणा यामुळे भारतातील भुईमूग उत्पादनात वाढ होऊन ते यंदा (२०१७-१८) ७ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला अाहे.

याअाधी भारतात भुईमूग उत्पादन ६.६ दशलक्ष टन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्याता अाता अाणखी वाढ होणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहेत. गेल्या वर्षी भारतात ६.३ दशलक्ष टन अंदाजित उत्पादन झाले होते. 
देशात खरीप हंगामात जून- जुलै महिन्यात भुईमूग लागवड केली जाते. तर सप्टेंबर- अाॅक्टोबर दरम्यान भुईमूग पिकाची काढणी केली जाते. यंदा ५.२ दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली होती. खरिपात पीक क्षेत्र वाढले. त्यात पोषक हवामान अाणि कीड प्रादुर्भाव कमी झाल्याने अधिक उत्पादन मिळण्याची शक्यता अाहे. 

देशातील भुईमुगाचे प्रतिहेक्टरी उत्पादन २ टनांपर्यंत पोचण्याची शक्यता अाहे. याअाधी प्रतिहेक्टरी उत्पादन १.८५ टनांपर्यंत पोचणार असल्याचे संकेत देण्यात अाले होते. अाता सुधारीत अंदाज अहवालात उत्पादन वाढणार असल्याचे स्पष्ट केले अाहे.

भुईमूग उत्पादनात गुजरात अाघाडीवर अाहे. मात्र, या राज्यात जुलैमध्ये अालेल्या पुराचा काही प्रमाणात पिकाला फटका बसला अाहे. यामुळे गुजरातमधून मर्यादित उत्पादन मिळणार अाहे. येथील काही शेतकऱ्यांनी भुईमुगाची पूर्नलागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी पुरामुळे चारापिके, कडधान्ये पिके घेतली अाहेत, असे ‘यूएसडीए’ने अहवालात म्हटले अाहे.

शेतकऱ्यांचा कडधान्ये पिकांकडे कल
भारतात खरीप हंगामात तेलबियांची लागवड कमी क्षेत्रावर झाली होती. येथील शेतकरी तेलबिया पिकांकडून कापूस, कडधान्ये, भाजीपाला पिकाकडे वळले अाहे. अनियमित पाऊस, कोरड्या हवामानामुळे लागवड उशिरा झाली, असे ‘यूएसडीए’ने म्हटले अाहे.

भारतातील भुईमूग उत्पादन अंदाज (२०१७-१८)
एकूण उत्पादन    ७ दशलक्ष टन
प्रतिहेक्टरी उत्पादन    २ टन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT