अ‍ॅग्रो

साखर, कापसाच्या भावात घसरण

डॉ. अरुण कुलकर्णी

या सप्ताहात कापूस, गहू, मका यांचे भाव कमी झाले. गवार बी व हरभरा यांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. साखर व कापसाचे भाव अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने कमी होतील. 

अमेरिकेतील शेती खात्याने १२ सप्टेंबर रोजी जागतिक उत्पादनाचे सुधारित अंदाज प्रसिद्ध केले. या अंदाजानुसार २०१६-१७ च्या तुलनेने २०१७-१८ मध्ये भारतातील गव्हाचे उत्पादन १०.३ टक्क्याने वाढेल (जागतिक १.१३ ने घट). इतर पिकांमधील वाढ/घट याप्रमाणे होईल : कापूस ११.११ टक्क्याने वाढ (जागतिक १३.१३ ने वाढ), तांदूळ ०.१४ टक्क्याने घट (जागतिक ०.६२ ने घट), तेलबिया ४.१८ टक्क्याने घट (जागतिक १.०६ ने वाढ), मका ४.८ टक्क्याने घट (जागतिक ३.६ टक्क्याने घट) व सोयाबीन १३ टक्क्याने घट (जागतिक ०.८६ ने घट). ऑक्टोबरपासून गवार बी साठी एनसीडीइएक्समध्ये ऑप्शन ट्रेडिंग सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अजून तशी सेबीकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

गहू
ऑगस्ट महिन्यात गव्हाच्या (ऑक्टोबर २०१७) किमती घसरत होत्या. (रु. १,६८८ ते  रु. १,६५५). या सप्ताहात त्या १.१ टक्क्याने घसरून रु. १,६३२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली)  रु. १,७७० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.४  टक्क्यांनी कमी आहेत. (रु. १,६९२). मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.  

मिरची
मिरचीच्या (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात रु. ७,८७२  पासून रु. ८,२६८ पर्यंत वाढल्या. या सप्ताहात त्या रु. ८,१९८  वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुंटूर) रु. ८,१५४ वर स्थिर आहेत. सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा डिसेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती १.७ टक्क्याने अधिक आहेत (रु. ८,२९४). निर्यात मागणी वाढत आहे. स्पॉट व फ्युचर्स किमती यापुढे वाढण्याचा कल आहे. 

मका
खरीप मक्याच्या (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात  घसरत होत्या. (रु. १,६०३ ते रु. १,५५६). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या पुन्हा ४.९ टक्क्याने घसरून रु. १,४६९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,४६१ वर आल्या आहेत. डिसेंबरमधील फ्युचर्स किमती रु. १,४८६ वर आल्या आहेत. हमीभाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता. या वर्षी तो रु. १,४२५ वर नेला आहे. खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यातील आवकेमुळे किमती काहीशा घसरण्याचा संभव आहे. 

साखर
साखरेच्या (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,५२३ ते रु. ३,७०८). या सप्ताहात त्या रु. ३,७१० वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,७०० वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,४०० वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. सणामुळे मागणी वाढती आहे. किमतीत मर्यादित वाढ होण्याची शक्यता आहे. 

सोयाबीन 
सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात २४ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,०७१ ते रु. ३,२७७). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या सोयाबीन उत्पादन क्षेत्रातील पर्जन्यमान सुधारल्यामुळे किंचित घसरून रु. ३,११९ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,०६१ वर आल्या आहेत. जानेवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,२३२ आल्या आहेत. हमीभाव (बोनस सहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता. या वर्षी तो रु. ३,०५० वर नेला आहे. किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. रु. ३,३०० – ३,३५० च्या आसपास जर भाव गेला तर हेजिंग करण्याचा विचार करावा.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ७,८९० ते ७,३४४). या सप्ताहात त्या रु. ७,७१८ वर आल्या आहेत.  स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,७६१ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने ०.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,७९८). पुढील किमती पर्जन्यमानावर अवलंबून आहेत. 

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमतीनी ऑगस्ट महिन्यात वाढ अनुभवली होती (रु. ३,५८२ ते ४,२३४). या सप्ताहात त्या ३.५ टक्क्याने वाढून  रु. ३,८७३ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,८६१ वर आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतीपेक्षा डिसेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्याने अधिक आहेत (रु. ३,९७७). राजस्थानमध्ये पाउस समाधानकारक आहे. मागणी वाढत आहे. किमतीत वाढ अपेक्षित आहे.

हरभरा
हरभऱ्याचे व्यवहार १४ जुलै रोजी एनसीडीइएक्समध्ये सुरू झाले. ऑगस्ट महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमती वाढत होत्या (रु. ४,८८९ ते ६,३१९). या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी वाढून रु. ६,१८५ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ६,०६५ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती एवढ्याच आहेत (रु.६,०६६). सध्या मागणी वाढती आहे; मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश येथे अजून अधिक पावसाची कमतरता आहे. पुढील काही दिवस किमतीत वाढ शक्य आहे. 

कापूस 
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात रु. १८,१८० व रु. १८,८९० या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी घसरून रु. १८,६३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती  रु. २०,०४२ वर आलेल्या आहेत. डिसेंबर  २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ८.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १८,२५०). पुढील काही दिवस किमतीत घट संभवते. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गासडी).
- arun.cqr@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT