अ‍ॅग्रो

‘ब्रीडिंग’, ‘हॅचिंग’ आणि व्यावसायिक त्रिस्तरीय देशी पोल्ट्री उद्योग 

सूर्यकांत नेटके

नगर जिल्ह्यातील अंतरवाली (ता. नेवासे) येथील कानडे कुटुंबाचा पोल्ट्री उद्योग आज केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर जिल्ह्याच्या बाहेर, तसेच परराज्यातही अोळखला जात आहे. विविध टप्पे पार करीत व्यवसायाचे विस्तारीकरण त्यांनी केले आहे. 

कानडे यांचा व्यवसाय, वृद्धीचे टप्पे  
अंकुश कानडे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक होते. नोकरीचा राजीनामा देऊन अंतरवाली येथे १९९७ मध्ये एक हजार ब्रॉयलर कोंबड्याचे पालन त्यांनी सुरू केले. पुढे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ न जुळल्याने दोन वर्षांत तो बंद करावा लागला. 
त्यानंतर दोन हजार देशी कोंबड्यांचे ‘चैतन्य ब्रिडर्स'' नावाने कुक्कुटपालन सुरू केले. तेथे पारंपरिक पद्धतीने पैदास सुरू केली. देशी कोंबड्या पाळल्या जात असलेल्या राशीन, कर्जत भागातील बाजारातून अंडी खरेदी केली जायची. 

पिलांना मागणी वाढल्यानंतर २००० मध्ये महिन्याला पंचवीस हजार अंडी उबवणी क्षमता असलेले यंत्र खरेदी केले.

त्याच वर्षी नगरमधील ‘एमआयडीसी’ भागात चैतन्य पोल्ट्री फिल्ड ऍण्ड हॅचरिज नावाचा व्यवसाय सुरू केला. त्यालाही मागणीही चांगली होऊ लागली. मात्र, देशी पक्ष्यांची तीन महिन्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत लागणारे खाद्य आणि होणारे वजन पाहता जास्त खर्च होत होता. व्यवसायाचे अर्थकारण काही जुळेना.

त्यानंतर दक्षिणेकडील राज्यातील गावरान व महाराष्ट्रातील गावरान यांचा संकर केला. त्या पक्ष्यांना चैतन्य गावरान असे नाव दिले. त्यानंतर पुढे व्यवसायाचा अधिक विस्तार केला.

ठळक बाबी 
   अंकुश कानडे यांचा मुलगा संतोष आपल्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हे पद सांभाळतो. 
   त्याचबरोबर ब्रिडींग, हॅचींग व मार्केटिंग या मुख्य जबाबदाऱ्याही त्याकडे आहेत. 
   संतोष बी.एस्सी. ॲग्री व एमबीए पदवीधारक आहेत. याशिवाय त्यांनी पोल्ट्री विषयातील तीन महिन्यांचा   ‘ॲडव्हान्स’ अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.  
   संकर केलेल्या पक्ष्यांची दक्षिणेकडील जात ही बंगळूर येथील या विषयातील प्रसिद्ध संस्थेकडून आणल्याचे संतोष सांगतात.
   सध्याची गुंतवणूक दीड कोटींची दिसते. मात्र, टप्प्याटप्प्याने कर्ज घेणे, परतफेड करणे यातून बॅंकेत पत तयार केली आहे.   
   विकसित केलेल्या कोंबडी वाणाच्या पेटंटसाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे.
   पूर्वी व्यावसायिक स्तरावर पशुखाद्य निर्मिती व्हायची. आता त्यात मोठी स्पर्धा झाल्याने केवळ पोल्ट्री व्यवसायावरच लक्ष केंद्रित केले आहे.  
   मुख्य कोंबड्यांव्यतिरिक्त पाचशे कडकनाथ कोंबड्यांचेही पालन केले जाते. 

तज्ज्ञांची प्रतिक्रिया 
पक्ष्यांची जात विकसित करताना किंवा त्याचे व्यवसायीकरण करताना दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. त्यातील एक म्हणजे पक्ष्यांतील रोगप्रतिकारक क्षमता. म्हणजे तो रोगांना किती बळी पडतो, हे पाहावे लागते. दुसरी बाब म्हणजे त्या-त्या हवामान विभागात टिकून वा तगून राहण्याची त्याची क्षमता असावी लागते. कारण हे पक्षी पुढे पोल्ट्री उत्पादकांकडे जाणार असतात. त्यांचे नुकसान या बाबींमुळे होणार नाही, हे पाहावे लागते. विकसित केलेल्या पक्ष्यांच्या जातीच्या त्या विषयातील राष्ट्रीय संस्थेकडून चाचण्या घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. 
- डॉ. एम. बी. धुमाळ, प्राध्यापक पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'पिक्सिस पायोनियर' जहाज LPG घेऊन मंगळूर बंदरात दाखल

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT