अ‍ॅग्रो

द्राक्षबागांसाठी यंदा पाच नवी बुरशीनाशके    

सकाळवृत्तसेवा

पुणे - द्राक्षबागांच्या विशेषतः निर्यातक्षम द्राक्षांच्या संरक्षणासाठी लेबल क्लेम मिळालेल्या सूचित रसायनांच्या वापरात यंदा पाच नव्या बुरशीनाशकांचा समावेश करण्यात आला आहे.  

गेल्या हंगामात राज्यात निर्यातक्षम बागांमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अंदाजे दोन हजार ९० कोटी रुपयांची उलाढाल केली होती. निर्यातक्षम बागांमध्ये अधिकृत सूचीमधील रसायनांचा योग्य वापर केल्यामुळे एकूण निर्यात २ लाख ३२ टनांची झाली. त्यापैकी १ लाख ३६ हजार टन द्राक्षे युरोपात निर्यात झाली होती. यंदाच्या हंगामासाठी पाच नवी संयुक्त बुरशीनाशके शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे (एनआरसी) संचालक डॉ. एस. डी. सावंत यांनी दिली. 

राज्याच्या कृषी आयुक्तालयातील कृषी निर्यात कक्षाचे तंत्रप्रमुख डॉ. गोविंद हांडे म्हणाले, की लेबल क्लेम असलेली कीटकनाशकांची सूची वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पर्याय उपलब्ध होतात. लेबल क्लेम नसलेली उत्पादने निर्यातक्षम बागेत अजिबात वापरू नयेत. संशोधन, कृषी विभागाचा पाठपुरावा, बागायतदार संघाची चिकाटी आणि शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशाच्या ग्रेपनेटमध्ये निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी सतत वाढते आहे. 

गेल्या हंगामात ३८ हजार बागांची झालेली नोंदणी यंदा ५० हजाराच्या पुढे जाण्याची आशा आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत निर्यातक्षम बागांची नोंदणी ५० रुपयांत होत असून त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत बिलंबशुल्कासह १०० रुपयांत शेतकऱ्यांना बागांची नोंदणी करता येईल. 

''यंदा उशिराच्या पावसामुळे राज्याच्या काही भागांत द्राक्षबागांना अडचणी आल्या आहेत. मात्र, छाटण्या यंदा वेळत असून केवळ २० टक्के छाटण्या शिल्लक असण्याची शक्यता आहे. अन्यथा आतापर्यंत ५० टक्के छाटण्या बाकी असतात. छाटण्या वेळेत होत असल्यामुळे बाजारात एकदम माल येण्याची समस्या कमी राहण्याची शक्यता वाटते, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. 

सूचीत नव्याने समाविष्ट झालेली कीटकनाशके  डाऊनी नियंत्रणासाठी
अॅझोक्स्ट्राॅबिन ८.३%+ मॅन्कोझेब ६६.७% डब्ल्यूजी (पीएचआय ६६)
कॉपर सल्फेट ४७.१५%+ मॅन्कोझेब ३०% डब्ल्यूडीजी (पीएचआय ६६) 
डायमिथोमॉर्फ १२ %+पायरॅक्लोस्ट्राॅबीन ६.७ % डब्ल्यूजी 
(पीएचआय ५५)

भुरी नियंत्रणासाठी 
बॉस्कॅलिड २५.२ %+ पायरॅक्लोस्ट्राॅबीन १२.८ % डब्ल्यूजी (पीएचआय ५५) 
करपा नियंत्रणासाठी- कार्बेन्डाझीम १२ %+ मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी (पीएचआय ६६)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT