अ‍ॅग्रो

नगरला चिंच प्रतिक्विंटल ९६०० ते १७९०० रुपये

सूर्यकांत नेटके

नगर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात १० हजार २३८ क्विंटल चिंचेची आवक झाली आहे. चिंचेला ९६०० ते १७९०० रुपयांचा दर मिळाला. गहू, ज्वारीच्याही आवकेत वाढ होत आहे. भाजीपाल्याची आवक जेमतेम असून, दर फारसा वाढलेला नाही.

नगर बाजार समितीत चिंचेची आवक वाढली आहे. येथे नगरसह औरंगाबाद, बीड, सोलापूर भागांतून चिंच विक्रीसाठी येत आहे. नऊ हजार सहाशे ते सतरा हजार नऊशे रुपयांचा दर मिळाला आहे. ज्वारी, गव्हाची काढणी झालेली असल्याने त्यांचीही आवक वाढू लागली आहे. मागील आठवड्यात गव्हाची १४५६ क्विटंलची आवक झाली. गव्हाला १६६१ ते १७०० रुपयांचा दर मिळाला, तर ज्वारीची ३९६ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २२०० रुपयांचा दर मिळाला. तुरीची ११६ रुपयांची आवक होऊन ३९०० रुपयांचा, तर हरभऱ्याची ६२९ क्विंटलची आवक होऊन ३२०० ते ३५०० रुपयांचा दर मिळाला.

लाल मिरचीची २८६ क्विंटलची आवक होऊन ३७८० ते १३५८०, सोयाबीनची ४३ क्विंटलची आवक होऊन ३४०० ते ३५००, गूळडागाची ६४४४ क्विंटलची आवक झाली. गूळडागाला २३३० ते ३५२५० रुपयांचा दर मिळाला. मुगाची ८२ क्विंटलची आवक झाली, मुगाला ४७०० रुपयांचा दर मिळाला. बाजरीची ५२ क्विंटलची आवक होऊन बाजरीला १०५१ रुपयांचा दर मिळाला. नगर बाजार समितीत भुसारची आवक वाढली आहे. चिंचेचा बाजारही चांगला असल्याचे बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे यांनी सांगितले. भाजीपाल्यात बटाटा, वटाणा, टोमॅटो, कोबी, फ्लावरची आवक जास्ती आहे. मात्र मागील सप्ताहाच्या तुलनेत जेमतेम दर आहे. टरबूज, खरबूज, द्राक्षाचीही बाजार समितीत आवक वाढली असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT