अ‍ॅग्रो

सोलापुरात लाल मिरची पोचली शंभर रुपयांवर

सुदर्शन सुतार

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात लाल मिरची, लसणाची आवक वाढली, तरीही मागणी चांगली असल्याने त्यांच्या दरातील तेजी टिकून राहिली. लाल मिरचीला प्रतिकिलो सर्वाधिक १०० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय लसणाला सर्वाधिक ३० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात लाल मिरचीची रोज १५० ते २५० क्विंटलपर्यंत आणि लसणाची १०० ते २०० क्विंटलपर्यंत रोजची आवक होती.  मिरचीची आवक या सप्ताहात काही दिवशी ४०० ते ५०० क्विंटलपर्यंतही पोचली, तर लसणाच्या आवकेतही जवळपास दुपटीने वाढ झाली. मिरची, लसूण दोन्हींची आवक स्थानिक भागातून झाली. आवकेत वाढ होत राहिली, तरी मागणीमुळे दर मात्र तेजीत राहिले. 

लाल मिरचीला प्रतिकिलो ४० ते १०० सरासरी ९० रुपये असा दर मिळाला. त्या आधीच्या सप्ताहातही त्यांच्या मागणी  आणि दरामध्येही तेजी अशीच टिकून  होती. लसणाला प्रतिकिलो १५ ते ३० व सरासरी २० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, बटाटा, ढोबळी मिरची, गवार यांच्या दरातील तेजी टिकून राहिली. त्यांची आवक ही प्रत्येकी २० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी ७० ते १५० व सरासरी १२० रुपये, बटाट्याला १५० रुपये व सरासरी १०० रुपये आणि ढोबळी मिरचीला ८० ते १८० वसरासरी १५० रुपये आणि गवारीला २०० ते ४०० व सरासरी ३०० रुपये इतका दर मिळाला.

त्याशिवाय कांद्याच्या आवकेत आणि दरात या सप्ताहातात काहीसा चढ-उतार झाला. कांद्याची आवक रोज ८० ते १५० गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याची सर्व आवक स्थानिक भागात राहिली, पण आवकेत फारशी वाढ झाली नाही, शिवाय दरही जैसे थे राहिले. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ८०० व सरासरी ४०० रुपये असा दर मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT