अ‍ॅग्रो

उन्हाळी काकडीचे मास्टर सचिन भोर

गणेश कोरे

पुणे जिल्ह्यातील धामणखेल (ता. जुन्नर) येथील सचिन खंडू  भाेर काकडी पिकातील प्रगतिशील शेतकरी अोळखले जातात. त्यांचे वडीलदेखील या पिकाची शेती करायचे. गेल्या सहा वर्षांपासून सचिन यांनीही सातत्य ठेवत या पिकात मास्टरी मिळवली आहे. आपले वडील व काका यांच्या साह्याने ते शेती सांभाळतात. 

उत्पादन
 सचिन सांगतात की, तीन महिन्यांच्या काळात एक दिवसाआड सुमारे एक ते दीड टनाचे तोडे होतात.पुढे ते वाढतातही. एकूण पीक कालावधीत सुमारे २० तोडे होतात.
 एकूण उत्पादन- एकरी २५ ते ३० टनांपर्यंत.

काकडीचे अर्थकारण
सचिन सांगतात की, किलोला १२ रुपये तरी किमान दर मिळतो. उत्पादन २० ते २५ टन गृहीत धरले तर दोन लाख २४ हजार रुपये ते तीन लाख रुपये हाती येतात. एकरी ८६ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. म्हणजेच तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात किमान दोन लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक देऊन जाते. असे दोन हंगाम गृहीत धरले तरी दुप्पट उत्पन्न हाती येऊ शकते. 

जानेवारी 
 उन्हाळी हंगामाच्या ताेंडावर काकडीची आवक कमी असते. त्‍यामुळे वाढलेल्या दराची संधी साधण्यासाठी या हंगामाची निवड
 काकडीचे थेट बियाणे लावले तर थंडीमुळे उगवण्याचे प्रमाण कमी, तर मरतूक जास्त हाेते. हे टाळण्यासाठी जानेवारीत पाॅलिहाउसमध्ये खासगी नर्सरीतून १० दिवसांच्या राेपांची लागवड केली जाते. यामुळे राेपांचा दर्जा राखला जाऊन दर्जेदार उत्पादनवाढीस मदत हाेते. 
 या रोपांची फेब्रुवारीत लागवड.
 या काळात वेलवर्गीय पिकांची वाढ चांगली होते.  

ठळक बाबी 
 सुमारे तीन महिन्यांचे पीक.
 पूर्वी सरी पद्धतीने पीक घेतले जायचे. आता ते बेडवर घेतले जाते.
 पिकाला पाणी भरपूर म्हणजे एकाअाड एक दिवस लागते. या भागात बोअरवेल्स तसेच धरण असल्याने पाण्याची सोय चांगली आहे. 
 पॉली मल्चिंगचा वापर.
  त्याचे फायदे
 खुरपणीचा खर्च वाचतो.
 पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
 पिकाचा जोम वाढतो. काकडीला तजेलदारपणा येतो.

या बाबींवर होतो  मुख्य खर्च
(लागवड ते काढणी- निविष्ठांव्यतिरिक्त)
 राेपवाटिकेत राेपे तयार करणे- प्रति राेप १ रुपया १० पैसै, एकरी ८ हजार राेपांप्रमाणे - ८ हजार ८०० रु. 
 मल्चिंग पेपर - एकरी ८ बंडल- ११, २०० रु.
 शेणखत तीन ट्राॅली - प्रति ट्राॅली ४ हजार रुपयांप्रमाणे - १२ हजार रु. 
 वेल बांबूवर बांधणीसाठी तंगुस, सुतळी, वेल बांबूवर चढविणे.
 या खर्चात ठिबक, मल्चिंग पेपर आणि बांबूचा उपयाेग पुढील टाेमॅटाे पिकासाठी हाेतो. 

मॉललाही विक्री 
अलीकडील काळात मॉलचा पर्यायही शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे. सचिनदेखील आपला माल मॉलला देतात. त्यास किलोला १८ रुपये दर मिळतो. मात्र त्यांची मागणी केवळ १०० ते १५० किलोपर्यंतच असते. 

बाजारपेठ 
फेब्रुवारीचा हंगाम हाच दर अधिक देण्याच्या दृष्टीने अधिक चांगला असल्याचे सचिन सांगतात.

सरासरी दर किलोला १२ ते १५ रुपये राहतोच. पूर्वी हाच दर किलोला २० ते २२ रुपयांपर्यंतही मिळायचा. सर्व माल वाशी मार्केटला पाठवला जातो. अनेक वर्षांपासून हीच बाजारपेठ पकडल्यामुळे अन्यत्र जाण्याची वेळच न आल्याचे सचिन म्हणाले. आमच्या परिसरात अलीकडील काळात काकडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. गावात अनेक काकडी उत्पादक असल्याने सर्वांचा एकत्रितपणे माल एकाच गाडीतून पाठवला जातो. एकाचा आदर्श दुसऱ्याला मिळून काकडीचा प्रसार होत गेल्याचेही सचिन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT