अ‍ॅग्रो

केळीचे दर ५५० रुपयांवर

सकाळवृत्तसेवा

नागपूर - निर्यातीचा मुद्दा मागे पडल्यानंतर विदर्भात पुन्हा केळीचे दर पडल्याने उत्पादकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. दरातील घसरणीमुळे क्‍विंटलमागे सुमारे ३०० ते ४०० रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती केळी उत्पादकांनी दिली.  

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे उघडणारे भाव केळी खरेदी विक्रीसाठी प्रमाण मानले जातात. विदर्भात अंजनगावसूर्जी (जि. अमरावती) येथील बोर्ड केळी दराबाबत विचारात घेतला जातो. विदर्भात सर्वाधिक साडेचार हजार हेक्‍टर केळी लागवड क्षेत्र अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यात आहे. चिखलदरा, अंजनगावसूर्जी (जि. अमरावती) अकोट (जि. अकोला) या भागात अधिक केळी होते. वाशीम जिल्ह्यात हे क्षेत्र २५ ते ३० हेक्‍टर असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जळगाव जिल्ह्यात पीक सातत्याने घेतले जात असल्याने पोटॅशचे प्रमाण कमी होत गेल्याने केळीच्या चवीतदेखील परिणाम झाल्याचे जाणकारांनी सांगितले. शिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीच्या सालीवर डाग पडतात. त्यामुळे निर्यातदारांकडून या भागातील केळीला मागणी घटू लागली आणि पर्यायाने ती विदर्भात वाढली. काही महिन्यांपूर्वीच अकोट तालुक्‍यातून ५१० टन (३० कंटेनर) केळी आखाती देशात निर्यात करण्यात आली. सुमारे १००० रुपये क्‍विंटलचा दर या माध्यमातून निर्यातदार केळी उत्पादकांना मिळाला. 

दर घटले
निर्यातीमुळे केळी उत्पादकांना १००० रुपये क्‍विंटलपर्यंतचा दर मिळाल्याने व्यापाऱ्यांनी ७०० रुपये क्‍विंटलने केळीची खरेदी त्या काळात केली. आता निर्यात थंडावल्याचे लक्षात येताच हे दर ५५० रुपयांपर्यंत खाली आणले आहेत.

केळी निर्यात केली त्यावेळी व्यापाऱ्यांनी ७०० रुपयांनी स्थानिक शेतकऱ्यांची केळी खरेदी केली. आता परत हे दर ५५० रुपये क्‍विंटलवर आणले आहेत. हे लक्षात घेता आम्ही पुन्हा निर्यातीच्या प्रयत्नात आहोत. त्याकरीता निर्यातदारांशी बोलणी सुरू आहे.
- पंजाबराव बोचे, शेतकरी, पणज, ता. अकोट, जि. अकोला.

विदर्भातील केळीवर सध्या शिगाटोकाचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे केळी डागाळलेली नसल्याने निर्यातदारांकडून वाढती मागणी आहे. ही संधी मानून शेतकऱ्यांनी निर्यातदारांच्या संपर्कात राहून जादा दर पाडून घेणे गरजेचे आहे.
- सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT