अ‍ॅग्रो

शेडनेटमधील भरीत वांग्याची आश्वासक गटशेती 

डॉ. टी. एस. मोटे

भरताचे वांगे म्हटले की आठवतो तो खानदेशच. अर्थात राज्यात इतरत्रदेखील या वांग्याची शेती असंख्य शेतकरी करीत आहेतच. पण नांदेड जिल्ह्यात हे वांगे घेण्याचा फारसा कल नाही. मात्र बाजारपेठेचा कल, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन या भागातील शेतकरीदेखील आपल्या भागासाठी अपारंपरिक असलेल्या पिकांचा शोध घेऊ लागले आहेत. जिल्ह्यातील लोहा तालुक्यात संकल्प शेतकरी गट कार्यरत आहे. त्यांनीही हेच उद्दिष्ट ठेवून पीक बदलावर भर दिला आहे. 

ढोबळी, काकडीनंतर भरताचे वांगे  
गट सुमारे तीन-चार वर्षांपासून नव्या पिकांच्या प्रयोगात व्यस्त आहे. सुमारे नऊ सदस्यांनी शेडनेटमध्ये ढोबळी मिरची तर सात जणांनी काकडी घेतली. मागील वर्षी सहा जणांनी एकूण पाच एकरांत शेडनेटमध्ये भरताचे वांगे घेण्याचा प्रयोग केला. गटाचे अध्यक्ष माधव सूर्यवंशी (चितळी), भालचंद्र कदम (हळद), गोविंद डांगे (पोखरभोसी), नरहरी हरिचंद्र कोटलवार (धानोरा) यांच्याकडे प्रत्येकी एक एकर तर हरी शिंदे (हळदव) व वसंत ढगे (पिंपळगाव) यांच्याकडे प्रत्येकी अर्धा एकरात वांग्याची लागवड होती. 

बांधणी 
झाडाच्या फांद्या ठिसूळ असल्याने व फुले नाजूक असल्याने बांधणीकडे लक्ष द्यावे लागते. थोड्याशा धक्‍क्‍यानेही फूलगळ होते. वांग्याची प्रमुख फांदी वरच्या बाजूला असलेल्या तारेला चाड्याच्या गाठीने बांधली जाते. रोपांची वाढ जसजशी होईल त्याप्रमाणे गाठ ढिली करून प्रमुख फांदी बांधता येते. वांग्याच्या दुय्यम फांद्या बांधण्यासाठी बेडच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी दहा फुटांवर सात ते आठ फूट उंचीचे बांबू जमिनीत गाडले जातात. त्यावर प्रत्येक सव्वा फुटावर नायलॉनची दोरी सरळ रेषेत बांधली  जाते. त्यानंतर दुसरी दोरी पुन्हा सव्वा फुटावर व तिसरी दोरी त्यानंतर दीड फुटावर बांधली जाते. या दोरीवर दुय्यम फांद्या चढवल्या जातात. यामुळे फांद्यांना आधार मिळून फूलगळ रोखता येते 
  
किफायतशीर अर्थकारण  
गटाचे अध्यक्ष सूर्यवंशी म्हणाले की, गटातील शेतकऱ्यांना वांग्याचे एकरी ३५ ते ४० टनांच्या दरम्यान उत्पादन मिळाले. दर प्रति किलो १८ ते २३ रुपये या दरम्यान राहिला. काही प्रसंगी तो कमाल ३५ रुपयेदेखील मिळाला. उत्पादन खर्च एकरी किमान अडीच लाख रुपयांपुढे आला. आमच्या हाती एकरी सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न आले. गटशेतीतील सर्वांचे मिळून उत्पादन पाहायचे झाल्यास ते अडीच टनांच्या आसपास असावे. शेडनेट उभारणीसाठी सुमारे १२ लाख रुपयांचे भांडवल लागले. त्यातील आठ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळाले. यापूर्वी ढोबळी मिरची परवडली. 
काकडीला यंदा दर कमी मिळाले. मात्र भरीताच्या वांग्याने आश्वासक उत्पन्न दिल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. या गटाकडे पूर्वी केवळ नऊ सभासद होते. परंतु एकमेकांची प्रेरणा मिळू लागल्याने शेतीत सुधारणा होत सभासदांची संख्या वाढत गेली. आज ती २० पर्यंत वाढली आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत  आहे. 

गट असल्याने प्रोत्साहन 
सूर्यवंशी म्हणाले की, एकत्रित आल्याने विक्री व्यवस्था सोपी झाली आहे. एकट्या दुकट्या शेतकऱ्याला ही गोष्ट तेवढ्या तुलनेने शक्य झाली नसती. शिवाय एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण ही जमेची मुख्य बाब असल्याचे सूर्यवंशी म्हणाले. एकत्रित खरेदी व एकत्रित विक्री हे या गटाचे वैशिष्ट्य आहे. आता गटातील शेतकऱ्यांकडे शेडनेट क्षेत्र सुमारे ३० एकरांपर्यंत झाले आहे. 

काढणी व मार्केटिंग 
सामूहिक शेती असल्याने वांग्याचे मार्केटिंग एकत्रित करणे गटाला शक्य झाले. जुलैमध्ये लागवड केली होती. साधारण फेब्रुवारीपर्यंत प्लॉट सुरू राहतो. पॅकिंग प्लॅस्टिक पन्नीमध्ये केली जाते. प्रति पन्नीत २० किलो वांगी असतात. सर्वांचा माल एकाच ट्रकमध्ये भरून हैदराबाद येथे पाठवण्यात आला. त्यामुळे वाहतुकीच्या खर्चात बचत झाली. दरही चांगला मिळण्यास मदत झाली. साधारण तीन ते चार दिवसांनी एक ट्रक हैदराबादला जायचा. माल विकल्यानंतर तीन दिवसांनी पट्टी मिळायची. दिवसा मजुरामार्फत तोडणी व पॅकिंग केले जायचे. रात्री ट्रकने माल रवाना व्हायचा. हैदराबादचे मार्केट लोहा भागातील शेतकऱ्यांना सुमारे तीनशे किलोमीटरवर आहे. 

शेती व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी (प्रातिनिधिक)
शेडनेटमध्ये चांगले उत्पादन येण्यासाठी गादीवाफा (बेड) काळजीपूर्वक तयार करावा लागतो. 
उभी-आडवी नांगरणी केल्यानंतर एकरी २० ब्रास शेणखत व १० टन साळीचे तूस टाकले. या तुसामध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो.
शेणखत व साळीचे तुस चांगले मातीत मिसळून घेतले. बेडचा टॉप दीड फुटाचा तर पाया तीन फुटांचा.
दोन बेडमध्ये पाच फुटांचा ‘पाथवे’. 
बेडवर ठिबकची नळी अंथरून ३० मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरला जातो.
बेसल डोसमध्ये एकरी शेणखत २० ब्रास, एसएसपी १०० किलो, सेंद्रिय खत २०० किलो, मॅग्नेशियम 
२५ किलो, पोटॅश ५० किलो असा वापर.  
पुणे येथून प्रति रोप ८ रुपयांप्रमाणे आणली. एकरी साधारणतः चार हजार रोपे लागली. 
लागवडीनंतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बुरशीनाशकांचे ड्रेचिंग, वेळोवेळी विद्राव्य खते
शेडनेटमध्ये नागअळी, पांढरी माशी आदींचा प्रादुर्भाव होतो. तापमान जास्त असताना कोळी, थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी फवारण्या केल्या. 

माधव सूर्यवंशी, ९७६५३८६८६९ 
(लेखक नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT