Milk 
अ‍ॅग्रो

गायी, म्हशीच्या दूध दरात दोन रुपयांची कपात

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सहकारी व खासगी दूध संस्थांकडील पिशवीबंद दूध वगळून उर्वरित गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले. या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार असताना राज्य शासनाने आता आधीच्या दूधदर वाढीवरून घूमजाव करीत दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गायीच्या आणि म्हशीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुधाच्या खरेदीदरात गेल्या दोन वर्षांत तीनदा वाढ करण्यात आली होती. सुरवातीला दोनदा प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली. तर त्यानंतर जून २०१७ मध्ये आणखी तीन रुपयांची दरवाढ करण्यात आली. गाय आणि म्हैशीच्या दूध दरात ही वाढ करण्यात आली होती. त्यामुळे गायीचे दूध प्रति लिटर २७ रुपये आणि म्हशीचे दूध प्रति लिटर ३६ रुपये या दराने खरेदी करणे अपेक्षित होते. ही दरवाढ सरकारी, सहकारी आणि खासगी दूध संघांना बंधनकारक होती.

बैठकीत झाला निर्णय
पशुसंवर्धन, दुग्धविकास सचिव यांच्या अध्यक्षतेखालील प्रदत्त समितीने नुकतीच एक बैठक घेऊन दूध दराबाबत आढावा घेतला. या बैठकीनंतर राज्यातील दूध दरात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफच्या असलेल्या गायीच्या दुधासाठी २५ रुपये प्रतिलिटर तर ६ फॅट आणि ९ एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधासाठी ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने आता शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा असंतोष पसरण्याची शक्यता आहे.

दूध उद्योगाबाबतचे निर्णय असे...
    गायीच्या दुधासाठी ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये दर
    ६ फॅट आणि ९ एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधासाठी ३४ रुपये दर
    ‘आरे भूषण’च्या दुधाची विक्री मुंबईत ३७ रुपये आणि उर्वरित महाराष्ट्रात ३६ रुपये दराने
    दूध वितरकांना मिळणारे टप्पेनिहाय कमिशन बंद
    यापुढे सरसकट ३ रुपये कमिशन देण्यात येणार 
    निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवसांत पुण्यासह राज्यातील तापमानात वाढ होणार; हवामान विभागाचा अंदाज

Pandharpur News: कॉरिडॉरविरोधात पंढरपुरात कडकडीत बंद; तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, ‘जुलमी कॉरिडॉर रद्द करा’च्या घोषणा!

युद्धात अडकलेल्यांची विमान कंपन्यांकडून लूट, ३० हजारांच्या तिकिटासाठी मोजावे लागतायत १.२० लाख

Kolhapur Zilla Parishad : बेकायदेशीर वृक्षतोड केला अन् सरपंचपद घालवून बसला, विभागीय आयुक्तांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेला दिला आदेश

SCROLL FOR NEXT