Grapes 
अ‍ॅग्रो

द्राक्ष निर्यातीसाठी मागणीत वाढ

ज्ञानेश उगले

नाशिक भागातील वडनेरभैरव, शिरवाडे पट्ट्यातील बहुतांश सोनाका वाणाच्या मालाला बांगलादेशी व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी राहिली. सांगलीतील सोनाका, सुपरसोनाका, एसएस, आरके या लांब आकाराच्या वाणांना चांगले दर मिळाले. मागील तीन वर्षांपासून उत्तर पूर्व भारतातील खरेदीदारांचा कल हा लांब आकाराच्या वाणांकडे जास्त राहिला आहे.

बांगलादेशासह दुबईच्या व्यापाऱ्यांकडूनही या वाणांना चांगला प्रतिसाद मिळतो. या व्यतिरिक्त नाशिक, पुणे विभागातील द्राक्ष हंगाम अद्याप मंद गतीनेच सुरू आहे. पाऊस आणि थंडी या नैसर्गिक आपत्तीच्या धक्क्यातून अजून द्राक्ष बाजार सावरलेला नाही.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात देशांतर्गत बाजारातील द्राक्षांना फार्मकटिंगला प्रति किलो ३५ ते ४५ रुपये व सरासरी ४० रुपये दर मिळाला. सोनाका तसेच इतर लांब आकाराच्या द्राक्षांना ५० रुपयांपर्यंत दर मिळाला. निर्यातीच्या द्राक्षांना ५५ ते ९० रुपयांपर्यंत दर राहिला.

पाऊस आणि थंडीचा फटका
बहराच्या छाटणीदरम्यान झालेला पाऊस आणि पक्वतेच्या टप्प्यात दीर्घकाळ घटलेलं तापमान याचा थेट परिणाम यंदाच्या द्राक्षाच्या हंगामावर झाला आहे. पावसाने अर्लीच्या बागांचे ४० टक्के नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन घटून १५ जानेवारीपासून द्राक्षांना चांगले दर मिळतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात तसे घडले नाही. या काळात देशांतर्गत बाजारात प्रति किलो ३५ ते ४५ रुपये तर निर्यातक्षम द्राक्षांना ५५ ते ८५ रुपये दर मिळाले.   

अतिथंडीमुळे पक्वतेच्या अवस्थेतील बहुतांश द्राक्षे तडकली. काही द्राक्षांना हेअर क्रॅकिंगला सामोरे जावे लागले. परिणामी निर्यातक्षम द्राक्षांचा तुटवडा कायम राहिला. १५ फेब्रुवारीपर्यंत युरोपात झालेल्या निर्यातीची स्थिती पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०० कंटेनर (६७१२ टन) कमी द्राक्ष निर्यात झाले. 

किमान १८ ब्रिक्स शुगरचे प्रमाण असल्याशिवाय द्राक्ष मालाची खुडणी करू नये, या महत्त्वपूर्ण बाबीकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे. देशांतर्गत तसेच निर्यातक्षम द्राक्षांतही गोडीची समस्या ठळकपणे जाणवत आहे. त्यामुळेही दरावरही परिणाम झाला. १५ फेब्रुवारीनंतर मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे जिल्ह्यातील १६ धरणे १०० टक्के भरली; खडकवासला, माणिकडोहचा पाणीसाठा सर्वात कमी

Latest Marathi News Update : Mahad Live : महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका फायनल किती वाजता अन् कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या नवी मुंबईतील हवामानाचा अंदाज

Gold Rate Today : तुळशी विवाहादिवशी सोने झाले आणखी स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Soybean Procurement Nagpur: अखेर हमीभावात सोयाबीन खरेदीचा मुहूर्त ठरला; पोर्टल सुरू, नऊ केंद्रांना मंजुरी, सोमवारपासून नोंदणी

SCROLL FOR NEXT