Agriculture-Engineering-Field
Agriculture-Engineering-Field 
अ‍ॅग्रो

कृषी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये विविध संधी

डॉ. सुहास पाटील

कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळीचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एकूण आठ शाखा आहेत. यामध्ये कृषी शास्त्र व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी शाखा म्हणजे बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी). महाराष्ट्रामध्ये चार विभागांमध्ये चार कृषी विद्यापीठे आहेत. प्रत्येक विद्यापीठामध्ये शासकीय चार तसेच विनाअनुदानित पंधरा महाविद्यालये सध्या कार्यरत आहेत. 

बी.टेक. (ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम -
बी. टेकच्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रमुख पाच विभाग आहेत.

कृषी यंत्रे व शक्ती विभाग -
 या विभागाअंतर्गत शेतीसाठी आवश्‍यक नांगरणीपासून काढणीपर्यंत सर्व प्रकारची कृषी अवजारे, यंत्रे, साधने यांचे डिझाईन, वापर, उपयुक्तता, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, देखभाल व दुरुस्ती यांचा अंतर्भाव होतो.

प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी विभाग - या विभागामध्ये विविध कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणेसाठी व प्रक्रिया केलेले अन्न पदार्थनिर्मितीसाठी साठवणुकीचे आवश्‍यक तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रे यांचा अभ्यास केला जातो.

जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग - सिंचनाच्या विविध पद्धती, उपसा सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, हरितगृह सिंचन, ऑटोमेशनचा सिंचनासाठी वापर, लॅण्डस्केपमध्ये सिंचनासाठीचे पर्याय, पाणीपुरवठा नियोजन, त्याचबरोबर जास्त पाण्याच्या ठिकाणी निचरा होण्यासाठीचे विविध पर्याय, वापर, आरेखन, व्यवस्थापन, निवड, निगा व देखभाल याचा प्रामुख्याने अभ्यास या विभागात केला जातो.

मृद व जलसंधारण विभाग - या विभागामध्ये मृद व जलसंधारणासाठी वापरात येणाऱ्या विविध उपचार पद्धती, मातीची धूप टाळण्यासाठीचे विविध पर्यायांचा अभ्यास, नियोजन, आरेखन व यासाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश होतो.

अपारंपारिक ऊर्जा अभियांत्रिकी - या विभागामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर शेतीसाठी व शेतीपूरक उद्योग आणि घरगुती वापराच्या उपकरणांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक सर्व तंत्राचा अभ्यास केला जातो. सोलर, पवनशक्ती, बायोमास, बायोडिझेल इत्यादी ऊर्जा स्रोतांचा अभ्यास करण्यात येतो.

उद्योजक/स्वयंरोजगार -
    टॅक्‍टर, पॉवर टिलर, कृषी यंत्रे यांची डिलरशीप व ट्रेडिंग
    विविध कृषी अवजारे, यंत्रे, साधने यांचे उत्पादन किंवा नामांकित.

कंपन्यांची डीलरशीप व ट्रेडिंग -
    प्रक्रिया उद्योग उभारणी.
    कृषी माल साठवणुकीसाठी शीतकरण सेवानिर्मिती.
    कृषी माल एक्‍सपोर्ट.
    कृषि निविष्ठा पुरवठा केंद्र.
    ॲग्री क्‍लिनिक, ॲग्री बिझनेस सेंटर ड्रीप/स्प्रिंकलर/पाइपपुरवठा केंद्र/डिलरशीप ॲग्रीकल्चर मॉल उभारणी.

पदव्युत्तर शिक्षणानंतर संधी -
    केंद्रीय व राज्यस्तरीय संस्थामध्ये कृषी शास्त्रज्ञ
    सेंटर वॉटर कमिशन
    बीज प्रक्रिया महामंडळ
    फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
    कृषी उद्योग विकास महामंडळ
    जलसंधारण विभाग
    पाटबंधारे विभाग
    कृषी विभाग
    पणन महामंडळ
    शासकीय व खासगी बॅंकामध्ये, जिल्हा परिषद, कृषी विभाग, पंचायत समिती या ठिकाणी कृषी अधिकारी म्हणून संधी आहे. 
    इतर पदवीधरांप्रमाणे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये एमपीएससी, युपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होता येते. 
    कृषी सेवा, वनसेवा, नाबार्ड या परीक्षा खास पदवीधरांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा देता येतात.

उच्च शिक्षण -
    गेटची प्रवेश परीक्षा देऊन आयआयटी, खरगपूर व आयआयटी, पवई येथे प्रवेश घेता येतो. 
    आयसीएआर-जेआरटीची प्रवेश परीक्षा देऊन देशभरातील सर्व केंद्रीय कृषी विद्यापीठ, राज्य कृषी विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येतो. या दोन्ही परीक्षा पास झाल्यास पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळते.
    महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी एमसीएईआरची प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश घेता येतो.
    कॅट, मॅट सारख्या प्रवेश परीक्षा देऊन आयआयएममध्ये तसेच इतर नामांकित राष्ट्रीय स्तरावरील संस्थात एमबीए करता येते.
    विविध संस्थांच्या प्रवेश परीक्षा देऊन ॲग्री बिझनेसमध्ये एमबीए करता येते.
- डॉ. सुहास पाटील, ९८२३३८११९१ ( प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे, जि. कोल्हापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT