अ‍ॅग्रो

लॉकडाऊनमध्ये पुण्यात संत्र्याला उच्चांकी दर

संदीप नवले

सुमारे अडीच महिन्यापासून असलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतांशी शेतमालाचे  दर पडले होते. या काळात पुण्यातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये संत्र्याला मात्र चांगली मागणी राहिली. आवक कमी राहिल्याने प्रति किलो ६० ते ८० रूपयांचा उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आधार मिळाला. सध्या पुणे मार्केटमध्ये इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेतून संत्र्यांची आवक सुरू असून प्रति किलो १०० ते १२० दराने विक्री करण्यात येत आहे. 

  पुणे मार्केटमधील आवक 
नगर जिल्हयातील नगर, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, पारनेर या भागात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन होते. त्यामुळे जानेवारी ते मे काळात सरासरी ७० -८० टन आवक होते. सर्वाधिक आवक मार्च- एप्रिल महिन्यात होते. मार्चमध्ये उन्हाचा पारा वाढत गेला, तशी संत्र्याला मागणी वाढत गेली होती. गेल्या वर्षी आंबिया बहारामध्ये नागपूर विभागातून सरासरी २० ते २५ टनांची आवक झाली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगर जिल्ह्यातील संत्र्याला चांगले दर 
  यंदा नगरमधील संत्र्याला सुरूवातीला जानेवारी, फेब्रुवारी काळात दर कमी होता. मार्चमध्ये ३० ते ४० रूपये प्रति किलो दर होता. या शेतकऱ्यांना मार्चनंतर लॉकडाऊनच्या काळात ६० ते ८० रूपये उच्चांकी दर मिळाला.  

नागपूर संत्र्याला चांगली मागणी 
नागपूर संत्र्याची आवक वाढल्यानंतर दर स्थिर राहून मागणी कायम असते. या काळात नागपूर संत्र्यालाही किलोला ४० ते ५० रूपये दर असतो. नागपूरमधून गेल्यावर्षी आवक कमी होती.  सरासरी १०० ते १२५ टन संत्र्यांची आवक झाली.     

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केरळ, कर्नाटकातून वाढली मागणी 
लॉकडाऊनमध्ये पुणे मार्केट अचानक बंद झाल्याने नगर भागातील शेतकऱ्यांपुढे संत्रा विक्रीचा प्रश्न तयार झाला. संत्र्यामध्ये क जीवनसत्व असल्याने ग्राहकांकडून अचानक मागणी वाढली होती. त्यामुळे केरळ, कर्नाटक भागातून मोठी मागणी आल्याने अनेक शेतकर्यांनी ट्रकमध्ये आठ ते दहाटन संत्रा भरून पाठविला. त्याला जागेवरच ५० ते ६० रूपये दर मिळाला.  

यंदा लॉकडाऊनमुळे पुणे मार्केटमध्ये आवक घटली, तरी अनेक शेतकरी किलोला ६० ते ८० रूपये दराने विक्री करत होते. सध्या परदेशातून आवक सुरू असून चांगले दर मिळत आहेत.
- रोहन उरसळ, व्यापारी, पुणे मार्केट 
  
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात संत्र्याला पंधरा दिवस मागणी कमी झाली. त्यानंतर ती वाढून दर वाढले. त्या काळात कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू या भागात संत्रा पाठविला.  
- महादेश रंगनाथ अकोलकर, संत्रा उत्पादक, करंजी, ता. पाथर्डी, जि. नगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira-Bhayandar : मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल... 'या' बड्या बिझनेसमनने थेट राज ठाकरेंनाच दिले आव्हान

'जावेद अख्तर, आमिर खानसह दाढीवाले आणि गोल टोपी घालणारे लोक मराठी बोलतात का? मनसेच्या 'त्या' कृतीवर नीतेश राणेंचा संताप

Nandapur First Bus Service : नंदापूरमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी

Earless Boy Hears: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

SCROLL FOR NEXT