अ‍ॅग्रो

केळी दरात किंचित सुधारणा

प्रतिनिधी

जळगाव - रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली असतानाच सध्या मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वामुळे केळीची मागणीही बऱ्यापैकी आहे. रावेरातून दिल्ली, जम्मू काश्‍मीरच्या व्यापाऱ्यांकडून आगाऊ नोंदणी करून सध्या खरेदी सुरू असून, दर आणखी १५ ते २० दिवस बऱ्यापैकी राहतील, असे संकेत आहेत. 

सध्या दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपये ऑन मिळत आहे. त्यात एकाच शेतकऱ्याची १५ ते १६ मेट्रिक टन केळी असली, तर त्यास ऑन आणखी वाढवून दिली जात आहे. दिल्ली येथील व्यापारी केळीचा साठा आपल्याकडे प्री कूलिंग चेंबर, रायपनिंग चेंबरमध्ये करून घेत असून, खरेदीही रोजची सुरू आहे. रावेरमधून सध्या रोज २०० मेट्रिक टन केळी दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्‍मिर व पंजाबमध्ये पाठविली जात असून, १६ किलोच्या बॉक्‍समध्ये केळीची पॅकिंग केली जात असल्याचे सांगण्यात आले. केळीला मागील आठवड्याच्या सुरवातीला १०५० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. ऑन फक्त निर्यातक्षम किंवा परदेशात पाठविल्या जाणाऱ्या केळीला काही कंपन्या देत होत्या. परंतु रमजान सुरू होताच दरात क्विंटलमागे ३० रुपयांनी सुधारणा झाली आहे. दिल्ली व जम्मू काश्‍मिरातील व्यापाऱ्यांनी केऱ्हाळे, खिर्डी, ऐनपूर, निंबोल, कुंभारखेडा, रसलपूर, मस्कावद, चिनावल, निंभोरा आदी ठिकाणच्या लहान व्यापारी व मोठ्या शेतकऱ्यांशी आगाऊ रकमा देऊन सौदे केले आहेत. 

यामुळे दरात किरकोळ तेजी आली आहे. सध्या आंब्यांची आवकही वाढली आहे. ही आवक पुढील महिनाभर वाढतच राहील. अशात केळीच्या बाजारावर परिणाम होण्याची शक्‍यता होती, परंतु रमजान महिन्यामुळे दर टिकून राहतील. पुढील २० दिवस दर स्थिर राहतील किंवा आणखी किंचित वाढतील, अशी माहिती मिळाली आहे. 

केळी दरात किरकोळ वाढ झाली आहे. दर टिकून आहेत. लोकल (ठाणे, मुंबई) मागणीही आहे. तर दिल्ली, पंजाब, जम्मू काश्‍मीरसाठी बॉक्‍स पॅकिंगही सावदा येथे सुरू आहे. 
- सुधाकर चव्हाण, केळी व्यापाराचे जाणकार

रमजान महिन्यामुळे केळी दरात वाढ झाली. मला ऑनचे दर मिळाले असून, रावेरातील केळीमधील देशांतर्गत बाजारासंबंधीची उलाढाल वाढली आहे. 
- अतुल पाटील,  केळी उत्पादक, केऱ्हाळे (जि. जळगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT