

balendra shah unga
esakal
nepal pm balen shah unga speech: संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ८१ व्या अधिवेशनात आपल्या पहिल्याच भाषणात नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी सध्याच्या जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, जगाने युद्धाच्या साहित्यासाठी अतिशय सक्षम आणि चोख रसद व्यवस्था निर्माण केली आहे, मात्र जीवनावश्यक अन्नाच्या वितरणासाठी मात्र ही व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी ठरली आहे.