Kalingad crop
Kalingad crop sakal
अ‍ॅग्रो

शेतशिवारात कलिंगड पीक जोमात

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरातील धामणगाव आदी गावांमध्ये कलिंगडाचे पीक सध्या जोमात आहे. शिवाय भावही मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे कलिंगडाचे पीक घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात गतवर्षी ऐन खरिपातील पिके काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाली होती. परिणामी खरिपातील कपाशी, सोयाबीन, मका आदी पिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले. निश्चितच याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धताही झाली. त्यामुळे अतिवृष्टीसारख्या संकटाशी सामना करत शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह इतर विविध पिकांची केली. त्यातून निश्चितच अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला आहे. पिंपळगाव रेणुकाई परिसरातील धामणगाव, पारध यासारख्या गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कलिंगड पिकाची लागवड केली आहे.

व्यापाऱ्यांकडून मिळतोय भाव

कोरोना नियंत्रणात आल्यामुळे आता बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय उन्हाळ्याची चाहूल लागली असल्यामुळे कलिंगडाला मागणी वाढत आहे. परिणामी मागील वर्षी कलिंगडाला ज्या प्रमाणामध्ये भाव होता त्यापेक्षा या वर्षी अधिक भाव आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून ५ ते ७ रुपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळत होता. परंतु यावर्षी मात्र १० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

''मागील वर्षी कलिंगडाला योग्य भाव मिळाला नसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावर्षी एक एकरावर कलिंगडाची लागवड केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कलिंगडाला मागणी वाढली. वाढत्या मागणीमुळे कलिंगडाच्या भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे कलिंगडातून चांगला नफा मिळण्याची आशा आहे.''

गोपाल काटोले शेतकरी,पारध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT