अ‍ॅग्रो

महाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी यंदा नाचणीस का दिले प्राधान्य ? वाचा सविस्तर

सुनील कांबळे

पाचगणी (जि.सातारा) ः महाबळेश्‍वर तालुक्‍यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या विळख्यात अडकलेल्या शेतकरी वर्गाने आर्थिक फायद्याची तमा न बाळगता नाचणी या पारंपरिक पिकास प्राधान्य दिले आहे.
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सरकारचा हिरवा कंदील 

महाबळेश्वर तालुका हे राज्यातील पावसाचे आगार असून, यापूर्वी तालुक्‍यात सर्रास शेतकरी बटाटा हे पारंपरिक आणि नगदी उत्पन्न देणारे बटाटा हे पीक मोठ्या प्रमाणावर घेत असत. त्याबरोबर जुन्या जातीचे ऑस्ट्रिया, निग्रो या जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड करत असत. 1992 मध्ये कॅलिफोर्निया स्ट्रॉबेरीने या भागात पाऊल टाकले अन्‌ नगदी उत्पन्न देणाऱ्या बटाट्याला बगल देऊन शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत कॅलिफोर्निया स्ट्रॉबेरीला झुकते माप दिले. मात्र, कोरोना विषाणूमुळे पर्यटकांच्या वाटा बंद झाल्या. घाऊक बाजारपेठेत स्ट्रॉबेरी जाण्यात येत असलेल्या अनेक अडचणींमुळे शेतकरी आर्थिक दलदलीमध्ये अडकला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांनी ताली बांधणे, पडझड झालेल्या ठिकाणी सुधारण्यासाठी वेळ दिला. 

राजकारण बाजूला ठेऊन एकत्र या; कंपन्यांनी तूर्तास बंद पाळा

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सातारा पालिकेने उचलले 'हे' महत्वाचे पाऊल

तालुक्‍यातील सर्रास शेतकऱ्यांनी अतिअल्प रक्कम खर्ची करत नाचणीची लागवड केली असून, त्याच्या जोडीला हायब्रीड, फराशी, वाटाणा, वरी लागवड तसेच भात पीकसुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले असून, पडद्याआड झालेल्या बटाटा या नगदी उत्पन्न देणाऱ्या पारंपरिक पिकास पुन्हा वाव दिला आहे. या भागातील शेतकरी पूर्वी चंद्रमुखी व ज्योती खुपरी या बटाट्याची लागवड करत असत. त्यामध्ये खुपरी ज्योतीला अधिक पसंती असते. या भागातील बटाटा घाऊक बाजारपेठेत वेफर्सकरिता प्रसिद्ध असे.

Edited By Siddharth Latkar 
 
पाच दशकांपासून 'हा' सुवासिक तांदूळ पिकताेय महाराष्ट्रातील 'या' गावात 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT