1) फळमाश्‍या आंबा फळावर अंडी घालताना दिसत आहेत. 2) आंब्यामध्ये फळमाशीच्या अळ्या दिसून येत आहेत.
1) फळमाश्‍या आंबा फळावर अंडी घालताना दिसत आहेत. 2) आंब्यामध्ये फळमाशीच्या अळ्या दिसून येत आहेत. 
अ‍ॅग्रो

आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापन

डॉ. धीरजकुमारकदम /विलास खराडे

आंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी त्यातील तुडतुडे, पिठ्या ढेकण, फळमाशी, शेंडा पोखरणारी अळी, खोडकिडा अशा १० ते १२ किडी महत्त्वाच्या आहेत. आंब्यावरील महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी.

जगभरात फळमाशीच्या ४०० हून अधिक जाती असून, ही कीड वर्षभर विविध फळपिकांवर आढळते. 

फळमाशीच्या बॅक्ट्रोसेरा डॉरसेलिस, बॅक्ट्रोसेरा झोन्याटा आणि बॅक्ट्रोसेरा करेक्टा या प्रमुख तीन जाती आंबा पिकावर आढळतात.

निर्यातीवेळी आंबा फळामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कटाक्षाने तपासला जातो. तो आढळल्यास मोठे नुकसान होऊ शकते. 

फळमाशीची ओळख व जीवनचक्र
प्रौढ - आंबा पिकातील फळमाशी पिवळसर सोनेरी रंगाची असून, आकाराने घरमाशीपेक्षा थोडी मोठी असते. 

अंडी - सामान्यतः काढणीस तयार झालेल्या फळांमध्ये मादी फळमाशी अंड नलिकेच्या साह्याने फळाच्या  सालीखाली पुंजक्यात अंडी घालते. एक मादी फळमाशी सुमारे  १०० - ३००  अंडी एका पुंजक्यात घालते. 

अळी - अळी फिक्कट पांढऱ्या रंगाची व डोक्याकडे निमुळती असते. अळी गरावर उपजीविका करते, त्यामुळे फळे कुजतात. खाली गळून पडतात. परिणामी अशी फळे खाण्यायोग्य राहत नाहीत. अळी अवस्था १० ते  १५ दिवसांची असते. 

कोष - पूर्ण वाढलेल्या अळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात. कोष अवस्था ८ ते १२ दिवसांची असते. कोषामधून फळमाशीचे प्रौढ किटक बाहेर येऊन पुन्हा अंडी देतात. 

अशा प्रकारे फळमाशीच्या एका वर्षात ७ ते ८ पिढ्या पूर्ण होतात.

नुकसान 
आंबा पिकामध्ये २५ ते ४० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव आढळून येतो. 
फळांची गुणवत्ता कमी होते. ती खाण्यायोग्य राहत नाहीत.

व्यवस्थापन 
फळांची काढणी योग्य वेळी करावी. झाडावर फळे पक्व होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

फळमाशीग्रस्त, बागेत खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. यातून फळमाशीची उत्पत्ती वाढते.

बॅक्ट्रोसेरा डॉरसेलिस या जातीच्या फळमाशीची कोषावस्था जमिनीत २ ते ३ सेंटिमीटर खोलीपर्यंत असते. झाडाखालील माती हलवून किंवा निंदून घ्यावी. या मातीमध्ये शिफारशीत दाणेदार कीटकनाशक मिसळावे.

प्रदुर्भावाच्या काळामध्ये झाडाखालची माती खुरप्याने २ ते ३ सेंटिमीटर उकरून त्यावर क्लोरोपायरीफॉस २ मिली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे तयार केलेले द्रावण माती पूर्णपणे ओली होईपर्यंत फवारावे. 

या किडीची अळी अवस्था ही फळाच्या आत असल्याने त्यांच्यापर्यंत रासायनिक कीटकनाशक पोहचत नाही. नियंत्रणासाठी फवारणीऐवजी सापळ्यांचा व विषारी आमिषाचा वापर करावा.  

रक्षक सापळे
या सापळ्यामध्ये एक कुपी असून, त्यात मिथाईल युजेनॉलचा कापसाचा बोळा ठेवतात. मिथाईल युजेनॉलच्या गंधाने नर फळमाश्या सापळ्यामध्ये आकर्षित होतात. आतमध्ये असलेल्या पाण्यात बुडून मरतात. 

प्रमाण - हेक्टरी २० ते २५ सापळे. पिकाच्या उंचीप्रमाणे ४ ते ५ फूट अथवा झाडावर टांगून ठेवावेत.

काळजी - १८ ते २० दिवसांनी मिथाईल युजेनॉलचा कापसाचा बोळा बदलावा. सापळ्यातील मेलेल्या माश्या काढून सापळे स्वच्छ ठेवावेत.

विषारी आमिष - फळमाशीच्या तोंडाचे अवयव केवळ द्रवरूप स्वरुपात पदार्थ खाण्यायोग्य असतात. त्यांच्यासाठी विषारी आमिष तयार करताना खराब फळे, गुळ २०० ग्रॅम अधिक मॅलॅथिऑन (५० टक्के ई.सी.) २० मि.लि. प्रति २० लिटर पाणी या प्रमाणे आमिष तयार करावे. बागेमध्ये विविध ठिकाणी हे द्रावण ठेवावे.  या द्रावणाकडे फळमाश्या आकर्षित होतात. अशा अमिषांचा उपयोग बागेमध्ये ठिकठिकाणी करावा. 
- डॉ. धीरजकुमार कदम (सहयोगी प्राध्यापक), ९४२१६२१९१० 
- विलास खराडे (पीएच.डी. स्कॉलर), ८६६८४६७९९५
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT