Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

Team India T20 Jersey: टी20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी भारताची नवी टी20 जर्सी लाँच करण्यात आली आहे.
Team India | T20 Jersey
Team India | T20 Jersey

India Cricket Team New T20 Jersey: जून 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेला आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे, अशात या स्पर्धेपूर्वी भारताची नवी टी20 जर्सी लाँच करण्यात आली आहे.

भारतीय संघाचे किट स्पॉन्सर आदीदास आहे. त्यामुळे त्यांनी सोमवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय संघाची नवीन टी20 जर्सी लाँच केली आहे. हा व्हिडिओ बीसीसीआयनेही रिपोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादव धरमशाला स्टेडियमवर उभे आहेत, यावेळी हेलिकॉप्टर भारताची नवीन टी20 जर्सी लटकवून फिरत आहे.

दरम्यान, भारताची नवीन टी20 जर्सी निळ्या आणि केशरी अशा दोन रंगात आहे. पुढच्या बाजूने आणि मागून निळ्या रंगात ही जर्सी असून हाताल केशरी रंग आहे. तसेच आदीदासची ओळख असलेले पांढरे पट्टेही खांद्यावर आहेत. हाताला केशरी रंग आहे. त्याचबरोबर गळ्याला केशरी पांढरा आणि हिरवा असे भारताच्या राष्ट्रध्वजातील तीन रंग आहेत.

ही नवी जर्सी भारतीय संघ आगामी टी20 वर्ल्डकपमध्येही घालणार आहे. भारतीय संघाची टी20 वर्ल्ड कप 2024 साठी निवड देखील काहीदिवसांपूर्वीच करण्यात आली आहे. भारतीय संघ या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.

Team India | T20 Jersey
Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

1 ते 29 जून दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या फेरीक भारताचा पहिला सामना पहिला सामना आयर्लंडविरुद्ध 5 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत आणि पाकिस्तान हा बहुप्रतिक्षित सामना होईल.

12 जूनला अमेरिकेविरुद्ध भारतीय संघ सामना खेळेल, तर 15 जूनला कॅनडाविरुद्ध भारताचा सामना होईल. भारताचे पहिल्या फेरीतील हे चारही सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com