BT_COTTON_ 
अ‍ॅग्रो

सरकार करणार बीटी कंपन्यांची चौफेर घेराबंदी

टीम अॅग्रोवन

नागपूर : राज्यात यावर्षी बीजी-२ तंत्रज्ञानावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. बोंडअळीची प्रतिकारशक्‍ती वाढीस लागल्याने हे घडल्याचा दावा केला जात आहे. सरकारने याची गंभीर दखल घेत असे वाण बाजारात आणणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाईची तयारी चालविली आहे. त्याकरिता कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांकडून एका प्रपत्रात माहिती भरून घेतली जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यात बीटी वाणांवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी फवारणी केली. त्यामुळे विषबाधा होत २२ जणांचे बळी गेले तर ४०० पेक्षा अधिक बाधित होत; त्यांच्यावर उपचाराची वेळ आली. त्यानंतरही बोंडअळी नियंत्रणात आली नाही. याची सरकारने गंभीर दखल घेत बोंडअळीला लवकर बळी पडणारे वाण विकसित करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाईची तयारी चालविली आहे. सोमवारी (ता. १३) मुंबईत झालेल्या बैठकीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या संदर्भाने निर्देश दिल्याची माहिती आहे.

या बैठकीला राज्यातील विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते. कृषी विभागदेखील दुकानातून विकल्या गेलेल्या बीटी बियाण्यांविषयी माहिती संकलनाचे काम आपल्या स्तरावर करणार आहे. या माध्यमातून बीटी बियाणे कंपन्यांची चौफेर घेराबंदी करण्याच्या विचारात सरकार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कृषी सहायक प्रपत्र भरून घेणार
ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यांच्याकडून कृषी सहायक नमुना जी (नियम १२ (१) नुसार प्रपत्र) भरून घेणार आहेत. बियाणे कोठून खरेदी केले, लॉट क्रमांक, किती एकरावर लावले, उगवणशक्‍ती अशी माहिती त्यावर शेतकऱ्याला द्यावी लागेल. पिकाच्या झालेल्या हानीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि योग्य अशा नुकसानभरपाईची व्यवस्था करण्यासाठी माझ्या शेताचे निरीक्षण करावे, अशी विनंतीदेखील या प्रपत्रातून केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT