अ‍ॅग्रो

मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदच

प्रतिनिधी

पुणे - अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. मॉन्सूनच्या अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता. २१) लांबण्याची शक्यता आहे. मॉन्सूनने दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पूर्ण केली असून, सोमवारी (ता. १७) प्रगतीची सीमा कायम होती. रविवारी (ता. १६) मॉन्सूनने संपूर्ण ईशान्य भारत व्यापला असून, पूर्व भारतातील सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागांत मॉन्सून पोचला आहे.  

केरळमध्ये यंदा आठवडाभर उशिराने येणाऱ्या मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमनही खूपच लांबले आहे. साधारणत: ७ जूनपर्यंत तळकोकणात, १० जूनपर्यंत पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशी भागात तर १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणारा मॉन्सून राज्यापासून फारच दूर आहे. सुरवातीपासून अडखळणाऱ्या मॉन्सूनला वायू चक्रीवादळामुळे अडथळा निर्माण झाला. शुक्रवारी (ता. १४) थोडीशी चाल करत, दक्षिण कर्नाटकच्या मंगळूर, म्हैसूर, तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत पोचलेला मॉन्सून अद्यापही तेथेच रंगाळला आहे. मॉन्सूनचे प्रवाह बळकट होऊन, महाराष्ट्रात पोचण्यासाठी शुक्रवारपर्यंत (ता. २१) वाट पहावी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत असलेले ‘वायू’ चक्रीवादळ आता निवळले आहे. सोमवारी (ता. १७) किनारपट्टीलगतच्या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र होते. रात्री उशिरापर्यंत हे क्षेत्र गुजरातच्या किनाऱ्यावर पोचण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रातील ही प्रणाली निवळून जाताच बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात शनिवारपर्यंत (ता. २२) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT