अ‍ॅग्रो

कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवक

विनोद इंगोले

नागपूर - बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक आवक कळमणा बाजार समितीत आठवडाभरात झाली. बटाट्याची आठवडाभरात २० हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. डाळिंबाचीदेखील वाढती आवक होती. 

गेल्या पंधरवड्यापासून इतर शेतमालाच्या तुलनेत बाजारात बटाट्याची चढी आवक आहे. ६ ऑगस्ट रोजी २१०७ क्‍विंटल तर त्यानंतर दररोज सरासरी ३ हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक बाजारात झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नागपूर जिल्हा हा मध्य प्रदेश सीमेवर असल्याने त्या भागात बटाटा उत्पादन घेतले जाते. त्यामुळे ही आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. १२०० ते १६०० असा दर असलेल्या बटाट्याचे दरातही आता काही अंशी तेजी आली. त्यानुसार दर १४०० ते १७०० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. डाळिंबाचीदेखील वाढत आवक आहे. २५०० क्‍विंटलची सरासरी डाळिंबाची रोजची आवक होत आहे. डाळिंबाला कमीत कमी १५०० तर जास्तीत जास्त ५००० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. कांद्याचीदेखील रोजची २००० क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक आहे. लाल कांद्याचे व्यवहार १००० ते १४०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. पांढरा कांदा ९०० ते १३०० रुपये क्‍विंटल असून, सरासरी आवक १००० क्‍विंटलची आहे. लसणाचे दर ६०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचे आहेत. लसूण सरासरी आवक ५०० क्‍विंटलची असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजारात आल्याचे दरही वधारले असून, कमीतकमी २००० तर जास्तीत जास्त ६ हजार रुपये क्‍विंटलने आल्याचे व्यवहार होत आहेत. आल्याची आवक ६०० ते ७०० क्‍विंटलची रोजची आहे. ८०० ते १२०० रुपये क्‍विंटलने टोमॅटोचे व्यवहार होत असून, टोमॅटोची आवक १५० क्‍विंटल इतकी आहे. चवळी शेंगाच्या दरात काही अंशी तेजी आली आहे. सुरवातीला १५०० ते २५०० रुपये क्‍विंटल असा दर असलेल्या चवळी शेंगाचे दर २००० ते ३००० रुपये क्‍विंटलवर पोचले. चवळी शेंगाची आवक १५० क्‍विंटलची आहे. भेंडीच्या दरात तेजी नोंदविण्यात आली. भेंडीचे दर सुरवातीला १४०० ते १८०० रुपये क्‍विंटलच होते. हे दर १८०० ते २५०० रुपये क्‍विंटलवर पोचले होते. भेंडीची आवक १५० क्‍विंटलची आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT