PM Modi Gifts Thirukkural to Vladimir Putin
esakal
नवी दिल्ली : ब्रिक्स (BRICS) परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सुमारे ४५ मिनिटे द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना तमिळ संत-कवी तिरुवल्लुवर यांच्या प्रसिद्ध 'तिरुक्कुरल' या ग्रंथाची रशियन भाषेतील विशेष आवृत्ती भेट दिली. या भेटीमुळे तिरुवल्लुवर आणि त्यांच्या साहित्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली (PM Modi Gifts Thirukkural to Vladimir Putin) आहे.