orange
orange 
अ‍ॅग्रो

संत्र्यांचे दर ११०० ते १४०० रूपये

विनोद इंगोले

नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची शक्यता तुर्त नाही आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला १६०० ते १९०० रुपये क्विंटल असलेल्या मोठ्या आकाराच्या संत्रा फळांचे व्यवहार या आठवड्यात मात्र अवघ्या ११०० ते १४०० रुपये दराने होत आहेत, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

कळमना बाजार समितीत गेल्या आठवड्यात संत्र्यांची आवक सात हजार क्विंटलवर पोचली. टप्प्याटप्प्याने ती १००० क्विंटल अशी कमी होत या आठवड्यात पुन्हा आवक पाच हजार क्विंटलपर्यंत पोचली. संत्रा दरही कमी-जास्त होत आहेत. १६०० ते १९०० रुपयांवरून दर ११०० ते १४०० रुपयांपर्यंत खाली आले. बाजारात मोसंबीची देखील आवक नियमित आहे. मोसंबीची आवक गेल्या आठवड्यात एक हजार क्विंटल होती. या आठवड्यात ही अवघ्या दोनशे क्विंटलवर आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  

मोसंबीचे दर गेल्या आठवड्यात ३७०० ते ४३०० रुपये होते. या आठवड्यात हे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मोसंबीची आवक कमी असल्याने काही अंशी दरात तेजी आली आहे. बाजारात गव्हाची ४०० क्विंटल आवक आहे. दर १६०० ते १८०० रुपये क्विंटल होते. तांदळाचे दर २५०० ते २७०० रुपये आहे. आवक अवघी २१ क्विंटलची आहे. 

बाजारात हरभऱ्याच्या आवकेत मोठे चढ-उतार आहेत. गेल्या आठवड्यात हरभऱ्याची १२५ क्विंटल आवक झाली. या आठवड्यात अवघी ७२ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. हरभरा दर गेल्या आठवड्यात ४६०० ते पाच हजार रुपये क्विंटल होते. या आठवड्यात हरभरा दर ४१५० ४८०० रुपये दरम्यान राहिले. 

तुरीची आवक गेल्या आठवड्यात तीन क्विंटल होती. या आठवड्यात ती ७२ क्विंटलवर पोहोचली. दर ५४०० ते ६००० रुपये आहेत. उडदाची सहा क्विंटल आवक, तर दर ६००० ते ६२०० रुपये होते. भुईमूग शेंगांची आवक दहा क्विंटल इतकी अत्यल्प होती.  शेंगांचा दर ४००० ते ४५०० असा स्थिर आहे. सोयाबीनचे दर ३७०० ते ४४१० असून आवक सरासरी एक हजार क्विंटलची आहे. 

बटाट्याला ३५०० ते ४००० रुपये दर मिळाला. आवक २५०० क्विंटल आहे. कांदा दर ५००० ते सहा हजार रुपये क्विंटल असून आवक ६०० क्विंटलची आहे. लसणाची आवक ५०४ क्विंटलची झाली. ६००० ते १०५०० रुपये दर आहे. आले आवक १७८४ क्विंटल असून दर २३०० ते २५०० रुपये असे होते. वाळलेल्या मिरचीची आवक ३१६  क्विंटल आहे. ८००० ते १५००० रुपये दर होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT