Russia-Ukraine war
Russia-Ukraine war esakal
अ‍ॅग्रो

खतांचे दर भडकणार? रशिया-युक्रेन युध्दाचा कृषी क्षेत्रावरही परिणाम

प्रशांत घाडगे

रशिया-युक्रेन युध्दामुळं जगभरातील आर्थिक घडी विस्कटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

सातारा :शिया-युक्रेन युध्दाचा (Russia-Ukraine war) दुष्परिणाम हळूहळू भारतात दिसू लागला आहे. मागील काही दिवसांत तेलाच्या दरात भरमसाट वाढ होत असताना आता इंधन व खतांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या युध्दाचा कृषी क्षेत्रावरही (Agricultural sector) मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येते. रशिया आणि बेलारूसमधून भारतात पोटॅश व फॉस्फरच्या कच्चा मालाची आयात केली जाते. मात्र, युध्द सुरू झाल्यानंतर मालाच्या आयातीत अडथळे निर्माण झाल्याने पोटॅश व फॉस्फरयुक्त खतांचे (Potash Fertilizer) दर वाढणार असल्याचे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

रशिया-युक्रेन युध्दामुळे जगभरातील आर्थिक घडी विस्कटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. या युध्दामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. रशिया, युक्रेन, बेलारूस यासारख्या देशांमधून भारतात कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात केला जातो. यामध्ये भारतात खतांच्या एकूण आयातीपैकी जवळपास १२ ते १५ टक्के आयात रशिया आणि बेलारूसमधून होते. त्यामुळे, या युद्धाचा परिणाम खतांच्या आयातीवरही होऊ शकतो. रशिया या देशात खतनिर्मितीचे मोठ-मोठे कारखानेही आहेत. तसेच खतनिर्मितीत जगभरात रशिया या देशाचा चौथा क्रमांक लागतो. रशिया आणि बेलारूस पोटॅशचे मोठे निर्यातदार देश आहेत. युक्रेनही पोटॅशची निर्यात करतो. त्यामुळे युक्रेन-रशिया युद्धामुळे पोटॅशचा पुरवठा होणे कठीण झाल्याने पुढील काही दिवसांत खतांचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, खतांची निर्मिती करण्यासाठी पोटॅशची आवश्यकता असते. रशियातून मोठ्या प्रमाणात पोटॅशची आयात भारतात केली जाते. परंतु, युध्द सुरू झाल्यानंतर पोटॅश व फॉस्फरसच्या कच्चा मालाचा पुरवठाच कमी झाल्यामुळे खतांच्या किमतीत ४०० ते ५०० रुपयांची वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच, रशिया आणि बेलारूसवर लावलेल्या निर्बंधांमुळे पुढील काळात पुरवठ्यामधील अडथळे वाढण्याची शक्यता आहे. तसेच, रशियातून येणाऱ्या कच्चा मालाचे आयातमूल्य वाढण्याची शक्यता असल्याचे खतांच्या किमतींवर परिणाम होणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत खतांवर मिळणारे अनुदान सरकारने बंद केल्याने खतांच्या दरात आधीच भरमसाट वाढ झाली होती. आता, पुन्हा एकदा रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम कृषी क्षेत्रावर होणार असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.

जिल्ह्यात ३५ हजार मेट्रिक टन खताचा साठा

सातारा जिल्ह्यात खताचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३५ हजार मेट्रिक टन खत शिल्लक असून, येत्या काही दिवसांत खतांचे दर वाढल्यास दुकानदारांकडून जादा दराने खतविक्री होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आधीच खतांचा साठा उपलब्ध करण्याची आवश्‍यकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT