nikam-family
nikam-family 
अ‍ॅग्रो

संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलता वाचा सविस्तर...

मुकुंद पिंगळे

दाभाडी (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम यांनी प्रतिकूल हवामान, अवर्षण यांच्याशी लढा देत अनेक वर्षांच्या तपश्‍चर्येतून प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. निर्यातक्षम व अर्ली द्राक्ष उत्पादनात कौशल्य मिळवण्याबरोबर फळपिके, भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे प्रयोग त्यांनी केले. बाजारपेठेचा अभ्यास करून कुटुंबाच्या ताकदीने बहुपीक पद्धतीतून आर्थिक स्थैर्यता मिळविली आहे.

दाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम यांच २५ एकर शेती आहे. सन १९८९ मध्ये अभियांत्रिकी पदविकेला त्यांनी प्रवेश घेतला. मात्र काही कारणांमुळे शिक्षण अर्धवट राहिले. पूर्वी बाजरी, मका, कांदा ही पिके होती. सन १९९१-९२ दरम्यान गणेश डाळिंबे, कालानुरूप बदल करत पुढे २० एकरांत आरक्ता, भगवा डाळिंबाची लागवड केली. पुढे तेलकट डाग रोगामुळे बागा काढाव्या लागल्या. दरम्यान अवर्षणग्रस्त भाग असल्याने पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी टॅंकर घेतले. ट्रक वाहतूक व्यवसाय केला. 

संघर्षातून विस्तारली द्राक्षशेती  
प्रतिकूल हवामान, दुष्काळ यातून संघर्ष सुरू होताच. तेलकट डाग रोगामुळे डाळिंबाचे नुकसान झाले होते.मात्र हिंम्मत न हारता धनराज यांनी प्रयोगशीलता टिकवली होती. लग्न झाल्यानंतर ज्यांच्यासोबत सोयरीक झाली त्यांची द्राक्षशेती होती. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. त्यातून २००८ मध्ये दोन एकरांवर द्राक्ष लागवड केली. अभ्यासवृत्ती व अनुभवाने शिकत टप्प्याटप्प्याने हे क्षेत्र १५ एकरांवर नेले. विविध संकटांनी परीक्षा पाहिली. कधी फयान, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी यामुळे हाताशी आलेला घास वाया गेला. मात्र न डगमगता त्याच उमेदीने ते पुन्हा उभारले. विविध प्रयोगांमधून उत्पन्नाचे स्रोत विकसित केले.  

सिंचनस्रोत केले बळकट 
जमीन मध्यम हलक्या स्वरूपाची. त्यामुळे पिके लवकर वाफसा स्थितीवर येतात. त्यात पाण्याचा प्रश्न बिकट होता. बागायती क्षेत्राला संरक्षित सिंचन होण्यासाठी २००२ मध्ये सुमारे सव्वा एकरांत एक कोटी २५ लाख लीटर क्षमतेचे शेततळे उभारले. साडेसहा हजार फूट अंतरावरून जलवाहिनी आणली. ठिबक सिंचनही केले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समस्येवर शोधला मार्ग 
मागीलवर्षी अतिवृष्टीत संपूर्ण १५ एकरांवरील हाताशी आलेली द्राक्षे मातीमोल झाली. केलेली मेहनत अन ३५ लाखांचा खर्च वाया गेला. सुमारे ७० लाखांपर्यंत अपेक्षित उत्पन्न डोळ्यासमोर संपुष्टात आले. शिल्लक द्राक्षे वाईन प्रक्रियेसाठी दिली. त्याचे अवघे नऊहजार रुपये हाती आले. अशा परिस्थितीतही हताश न होता धनराज जिद्दीने उभे राहिले. पुढील तीन-चार महिन्यांच्या काळासाठी याच द्राक्षमांडवाचा वापर करून बागेत विविध भाजीपाला घ्यायचा. त्यातून उत्पन्न मिळवायचे व नंतर द्राक्ष छाटणीकडे वळायचे असे ठरले. 

  त्यातून घेतलेली पिके- टोमॅटो, कारले, ढोबळी मिरची, काकडी 
  प्रत्येक पिकाचे एकरी उत्पादन- सुमारे ८ ते १० टन वा त्यापुढे
    द्राक्षाला दिलेली खते या पिकांना उपयोगी पडल्याने काही पिकांचे एकरी १५ टनांपुढेही उत्पादन. 

    मालेगाव, सटाणा बाजारपेठांत मागणी नसल्याने दर कमी होते. मग शेजारील गुजरात व मध्यप्रदेशातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून पुरवठा केला. गुणवत्ता, रंग व आकारामुळे पसंती मिळत गेली. स्थानिक बाजाराच्या तुलनेत अधिकचा दर मिळाला.

शेतीतील महत्त्वपूर्ण बाबी
  प्रयोगशीलता, नावीन्यात व व्यवहार्यता या तीन बाबींना ठेवले केंद्रस्थानी 
  सर्व कुटुंब एकत्रित राबते. धनराज शेती, मजूर व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार, पत्नी प्रमोदिनी महिला मजूर नियोजन, भाजीपाला तोडणी, प्रतवारी नियोजन पाहतात. मुलगा सुदर्शनही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतो. कृषी पदवीचे शिक्षण घेत असलेला मुलगा अक्षय विविध प्रयोग करतो. वडील यादवराव यांची देखरेख व मार्गदर्शन राहते. 
 कमी खर्चात अधिक उत्पन्नासाठी जैविक निविष्ठांचा वापर राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्र, गाझीयाबाद (उत्तरप्रदेश) येथील जिवाणू खतांचे द्रावण अक्षय याने मध्य प्रदेशातून उपलब्ध केले. त्यासह जीवामृत निर्मितीसाठी आठ टाक्या तयार केल्या आहेत.  दर्जेदार व भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड  पीकनिहाय वेळापत्रक निश्चित करून कामकाज व अचूक नोंदी  कमी मनुष्यबळात यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून कार्यक्षमता  ग्रेडिंग, पॅकिंग करून विक्री  खर्चात बचत करण्यासाठी रासायनिक खते व कीडनाशकांचा गरजेएवढाच वापर  शेतीला पशुपालनाची जोड  कृषी संशोधन केंद्रे, प्रयोगशील शेतकऱ्यांकडे भेटी देऊन कालानुरूप बदल   २००२ मध्ये उभारलेले मालेगाव तालुक्यात कदम यांचे पहिले शेततळे असावे.  गेल्या पंधरा वर्षांच्या काळात या भागात फारसे प्रयोग न झालेल्या केळी, हळद, आले यांचे प्रयोग व चांगले उत्पादन. खरबूज, टरबूज, इनलाईन ठिबकवर कांदा, मका, बाजरी 

शेतीतून वैभव 
  पूर्वीच्या १२ एकरांत १३ एकरांची भर घालत २५ एकरांपर्यंत शेतीचा विस्तार 
  अद्ययावत यांत्रिकीकरण
  मजुरांसाठी निवासव्यवस्थेसह कौटुंबिक, आरोग्य व आवश्यक सुविधा 
  मजुरांची ने-आण व शेतमाल वाहतुकीसाठी स्वतःची वाहन व्यवस्था

द्राक्षशेती 
    आगाप निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन
     क्षेत्र (एकर)- नानासाहेब पर्पल ३, 
क्लोन टू- ३, शरद सीडलेस १.५, थॉम्पसन ४, सोनाका (यंदा) २.५ एकर. 
    उत्पादन एकरी- ११ ते १३ टन
    निर्यात: ७० ते ८० टक्के (दुबई,रशिया, 
थायलंड, युरोप)
    दर- ब्लॅक वाण- किलोला ९० ते १५० रुपये. व्हाईट- ७५ ते १२० रुपये.

  धनराज निकम, ८३२९२७९५१२    अक्षय निकम, ८४११९७०८५७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT