अ‍ॅग्रो

साताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति दहा किलो

सकाळवृत्तसेवा

सातारा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १६) टोमॅटोची ३६ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो टोमॅटोस २५० ते ३५० असा दर मिळाला आहे. रविवारच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक कमी असून दहा किलोमागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.

संक्रांतीचा सण झाल्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. वाटाण्याची पाच क्विंटल आवक झाली असून दहा किलो वाटाण्यास २२० ते २५० असा दर मिळाला आहे. काकडीची पाच क्विंटल आवक झाली असून दहा किलो काकडीस १०० ते २५० असा दर मिळाला आहे. हिरवी मिरची नऊ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १५० ते २०० असा दर मिळाला आहे.

फ्लाॅवरची ३५ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लाॅवरला १०० ते १५० असा दर मिळाला आहे. कोबीची १५ क्विंटल आवक झाली असून दहा किलो ५० ते १०० असा दर मिळाला आहे. वांग्याची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलोस २०० ते २५० असा दर मिळाला आहे. दोडक्याची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलोस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. 

भेंडीची एक क्विंटल आवक झाली असून प्रतिदहा किलो भेंडीस ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. पालेभाज्यात मेथीची एक हजार जुड्यांची आवक झाली असून मेथीस शेकड्यास ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची १५०० जुड्यांची आवक झाली असून कोथिंबिरीस शेकड्यास ६०० ते ७०० असा दर मिळाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT