Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

Breaking Marathi News Live Update : राजकारण, पाऊस, वाहतूक, गुन्हेगारी, शिक्षण, हवामान आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Pune Live हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

शिरूरमध्ये ‘व्हीके कंपनी शिरूर’ या समाजमाध्यमावरील पानावर हातात पिस्तूल घेऊन तयार करण्यात आलेली रील प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. या रीलमध्ये विकी खराडे याला ‘शिरूरचा खरा किंग’ अशी प्रतिमा देण्यात आली असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हातात पिस्तूल घेऊन समाजमाध्यमांवर दहशत निर्माण करणारी प्रतिमा दाखविणाऱ्या या प्रकाराची पुणे ग्रामीण पोलिसांकडून दखल घेतली जाणार का, पिस्तूल नेमके कोणाचे आहे, ते परवानाधारक आहे का आणि रील तयार करून प्रसारित करणाऱ्यांवर कोणती कायदेशीर कारवाई होणार, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com