agrowon effect 
अ‍ॅग्रो

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार - जिल्हाधिकारी

प्रतिनिधी

अमरावती - विम्याचा लाभ मिळू नये, याकरिता पर्जन्यमापक यंत्रच बंद करण्यात आल्याचा प्रकार शिरगाव कसबा येथे घडला होता. याबाबत सोमवारी (ता.३) तडकाफडकी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांशी फोनवरून संपर्क साधण्यात आला. त्यानंतर दुपारी बैठकही पार पडली. या प्रकरणात शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

१ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत ३० मिमी पाऊस झाला. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी १९ हजार २५० रुपयांचा विमालाभ मिळणार होता. त्याकरिता सर्कलमधील पावसाची नोंद ग्राह्य धरली जाणार होती. अमरावती जिल्हा प्रशासनाने यासंदर्भाने जागृती केली. परिणामी, शिरजगाव कसबा येथील १३५० शेतकऱ्यांनी १५४३ हेक्‍टरवरील संत्राक्षेत्र संरक्षित केले. जिल्ह्यात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पाऊस झाला; परंतु शिरजगाव कसबा येथे बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीतील नोंदीच घेण्यात आलेल्या नाहीत. त्याआधीच्या व नंतरच्या नोंदी मात्र यात आहेत. त्यामुळे संशयाला वाव असल्याने शेतकऱ्यांनी या प्रकरणात पर्जन्यमापक यंत्रणेची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या ‘महावेध’शी संपर्क साधला. त्यांनी सयंत्राची पाहणी केली आणि त्याचा अहवाल प्रलंबित आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आली; परंतु या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यात आली नाही. 

‘ॲग्रोवन’ने सोमवारी (ता.३) यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत प्रशासनाने तत्काळ शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. जिल्हाधिकारी नवाल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कमलेश रोहटे, नितीन आवारे, संजय गुर्जर, पंकज ढोले, विवेक लांडे, महेंद्र ठाकरे, वीरेंद्र आजनकर, वैभव गणोरकर, गणेश आकोटकर, रोहित पोकळे आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT