11 people were shifted to the hospital in 108 ambulances 
अहिल्यानगर

वाढदिवसाची हॉटेलमधील पार्टी जीवावर बेतली; ११ जणांना १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : रात्री वाढदिवसाची जोरदार पार्टी झाली. त्याला सुमारे ४० तरुण उपस्थित होते. अन्‌ सकाळी हॉटेलच्या मालकाचा मुलगा व घरातील अजून एका महिलेसह एकाच घरातील ११ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली.

तालुका प्रशासनाने तातडीने १०८ क्रमांक रुग्णवाहिका बोलावून त्यांना अकोले संगमनेर येथे हलविले तर सुमारे ४० व्यक्तींना होम कोरांटाईन केले आहे, अशी माहिती डॉ. संतोष चोळके यांनी दिली. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. हे क्षेत्र आता प्रतिबंधात्मक म्हणून जाहीर करुन सील केले आहे. त्यामुळे वसाहतीत असलेले हॉटेल कोणाच्या आशीर्वादाने सुरु होते? असा सवाल भंडारदराच्या ग्रमस्थांनी केला आहे.

अकोले तहसीलदार, राजूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक व भंडारदरा वसाहतीतील जलविद्युत प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी रोटे यांना हॉटेल बंद करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात  आला. परंतु या निवेदनाकडे कोणीही लक्ष दिले नाही. शेवटी ते हॉटेल कालपर्यंत सुरू होते. आज तो हॉटेल मालक व त्याच्या हॉटेलमधील ११ व्यक्ती कोरोना पोझिटिव्ह अढळले. यामुळे भंडारदरा गावतील नागरिक व भंडारदरा वसाहतीतील नागरिक हादरून गेले आहेत.

भंडारदरा ग्रामस्थांनी मागणी केली आहे. यामध्ये तालुका प्रशासन जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर व हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडेकेली आहे. पुढील दोन दिवसात कार्यवाही व्हावी, अन्यथा भंडारदरा ग्रामस्थ ग्रामपंचायत व कोरोना कमीटी कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री व पर्यटन विकास मंत्री यांना भंडारदरा पर्यटन क्षेत्र पर्यटकांसाठी बंद करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहित भंडारदराचे सरपंच पांडुरंग खाडे व उपसरपंच गणपत खाडे यांनी दिली. 

या हॉटेलमध्ये मुंबई येथून चार दिवसापासून पर्यटक येऊन जेवण करून जातात. स्थानिक कमिटीने पोलिस, तहसील कार्यालय, पाटबंधारे विभाग उपअभियंता रोटे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज हॉटेल मालकासह ११ लोक  बाधित झाले. असून यास जबाबदार कोण असा सवाल विचारून भंडारदरा ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.

वाढदिवसाच्या पार्टीत शेंडी व कॉलनीतील २५ तरुण व इतर असे सुमारे ४० लोक उपस्थित होते प्रशासनाने याची चौकशी करून त्यांची मेडिकल तपासणी करावी अन्य था कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही. तर नगर येथून एक व्हीआयपी आपल्या नातेवाईकाना घेऊन या हॉटेलमध्ये जेवण करून गेल्याची चर्चा आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : बळीराजा हवालदिल! दिवाळीनंतरही मुसळधार पाऊस, त्र्यंबकेश्वरमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान, पीक खाचरात सडले

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

SCROLL FOR NEXT